16 लाख 89 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त. 10 व्यक्ती विरुद्ध 09 गुन्हे दाखल. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशांवर लातूर पोलिसांची कारवाई…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

लातूर ;

           पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात संपूर्ण लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर कठोर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात चालणाऱ्या अवैध धंद्याविरुद्ध कठोर व प्रभावी कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात दिनांक 11/07/2025 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 वाजण्याचे सुमारास एकाच वेळी अचानकपणे लातूर जिल्ह्यातील 23 पोलीस ठाणे हद्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या 100 मिटर परिसरातील पानटप-या, किराणा दुकानांची 67 पथकाकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री,वाहतूक साठवणूक साठी प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, गुटखाची अवैध विक्री व्यवसाय साठवणूक, वाहतूक करीत असताना मिळून आलेल्या इसमावर एकूण 09 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून 16 लाख 89 हजार 287 रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
         पोलीस ठाणे चाकूर येथे अवैध गुटखा ,सुगंधी तंबाखू विक्री व साठवणूक संदर्भातील 03 गुन्हे, तर पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक येथे प्रत्येकी 02 गुन्हे असे एकूण 09 गुन्हे भारतीय न्याय संहिता चे कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न मानके अधिनियम 2006 चे कलम 59 अन्वये खालील नमूद आरोपी विरुद्ध दाखल करण्यात आले आहे.

1) मारुती राजेंद्र सोमवंशी,वय 32 वर्ष,राहणार सोसायटी चौक, चाकूर.

2) बालाजी विठ्ठल कोरे, वय 28 वर्ष, राहणार अलगरवाडी तालुका चाकूर.

3) प्रमोद निवृत्ती कुंभार, राहणार घरणी, तालुका चाकूर.

4) सुनीलसिंग अनिलसिंग ठाकूर, वय 35 वर्ष, राहणार आनंदनगर,झीनत सोसायटी लातूर.

5) सिराज गयास अली सलाउद्दीन शेख, वय 51 वर्ष, राहणार शिरूर अनंतपाळ.

6) अजीम उमाटे, राहणार कपिल नगर,लातूर.

7)फिरोज उमाटे, राहणार कपिल नगर, लातूर.

8) असलम उमाटे, राहणार कपिल नगर, लातूर.

9) जहीरपाशा चांदपाशा परदेशी, वय 42 वर्ष, राहणार आझम चौक, लेबर कॉलनी, लातूर.

10) समीर शेख, राहणार खाडगाव रोड लातूर.
असे असून यांचे विरुद्ध वर नमूद कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाणे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलिसांकडून सदरची कारवाई करण्यात आली ही तपासणी मोहीम नियमित पणे सुरू असणार असून तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री करणाऱ्या विरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट