सामुहिक बलात्काराचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलीसांना मोठे यश…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पालघर: दि.१७/१२/२०२२ रोजी दुपारी १४.०० वाजताच्या सुमारास यातील पिडीत मुलीचे वडिलांनी सातपाटी पोलीस ठाण्यात येवून त्यांची अल्पवयीन मुलगी ही काल रात्री पासून घरी आली नसल्याचे सांगितले. तसेच तिला फोन लावला असता, ती फोनवरती रडते अशी वगैरे मजकूरची हकिकत सांगितली. त्यानूसार तात्रिक बाबींचा आधार घेवून, सदर मुलीचा शोध घेवून तिस सायंकाळच्या सुमारास मौजे हरणवाडी येथून ताब्यात घेण्यात यश आले.
सदर मुलीस सुस्थितीत ताब्यात घेवून, तिच्याकडे अधिक विचारपूस केली असता, मौजे माहिम येथील समुद्रकिनारी असलेल्या एका बंद बंगल्यात तसेच माहिम समुद्रकिनारी असलेल्या झाडीमध्ये दि. १६/१२/२०२२ रोजी रात्री २०.०० वाजता ते दि.१७/१२/२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान एकूण ०८ आरोपींनी तिच्यावर तिच्या इच्छेविरूध्द सामुहिक पध्दतीने शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले. त्यानूसार नमूद ०८ आरोपी विरुध्द सातपाटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र. ९४ / T २०२२ भारतीय दंड संहिता अधि. १८६० चे कलम ३७६, डी. ए. ३७६ (३), ३६६ ए, ३४१, ३४२, ३२३, ५०४, ५०६ सह पोक्सो अॅक्ट ४, ६, ८, १२ अन्वये दाखल केला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांच्या आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर व श्री. प्रेमनाथ ढोले, सहायक पोलीस निरीक्षक सातपाटी पोलीस ठाणे यांची तपास पथके तयार केली. नमुद पथकांनी सर्व आरोपींना दिनांक १८/१२/२०२२ रोजी पहाटेच्या सुमारास अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास हा श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग या करीत आहेत.
सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांच्या आदेशान्वये श्रीमती निता पाडवी, उपविभागीय पोलीस अधिकारी पालघर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, श्री. प्रेमनाथ ढोले, सहायक पोलीस निरीक्षक सातपाटी पोलीस ठाणे, भिमसेन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक केळवा पोलीस ठाणे, मपोउपनिरी/ सुप्रिया मांढरे, नेमणुक पालघर पोलीस ठाणे, पोउपनि / मयुरेश अंबाजी, नेमणुक सातपाटी पोलीस ठाणे, तसेच सातपाटी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट