प्रेमसंबधातुन महिलेचा खुन आरोपी अनिल जांभेकर अखेर स्था.गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या जाळ्यात…

0
WhatsApp Image 2025-07-12 at 2.03.13 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती ;

आरोपीचे नाव ०१) अनिल झनकराम जांभेकर वय ३५ वर्ष रा. गळंकी (औरंगपुर) ता. अचलपुर

दिनांक १०/०७/२०२५ रोजी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा हददीतील ब्राम्हणवाडा ते शिरजगाव रोडवरील बगाडीचे नाल्यात एका अज्ञात महिलेचे कुजलेले प्रेत दिसून आल्याची माहीती पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा येथे मिळताच मा.श्री. पंकजकुमार कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा., शुभम कुमार, सहा. पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह पोलिस निरीक्षक श्री किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा. सहा. पोलिस निरीक्षक महेंद्र गवई, ठाणेदार, पो.स्टे. शिरजगाव कसबा यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता ब्राम्हणवाडा ते शिरजगाव रोडवरील नाल्यात एका २५ ते ३० वयोगटातील महिलेचे अर्धवट कुजलेले प्रेत तिचे हातावर दुर्गा व अनिल असे नावे गोंदलेले तसेच प्रेताचे हातपाय बांधुन ब्लॅकेट मध्ये गुंडाळून असल्याचे दिसुन आल्याने सदर महिलेचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खुन केला असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मा.श्री. विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांनी अधिनस्त अधिकारी यांना सदर प्रकरणाचा छळा लावण्यासंबधाने मार्गदर्शन करुण गुन्हा उघडकिस आणनेयायत आदेशीत केले.

सदर प्रेत हे अनोळखी महिलेचे तसेच कुजलेले असल्याने त्या प्रेताची ओळख पटविणे आवश्यक व अत्यंत जिकरीचे होते. मृत महिलेच्या हातावर गॉदलेले A M दुर्गा व Anil हि नावे तसेच मृतकाचे कपडे यांचे फोटो स्थागुशा पथकातील विविध सोशय मिडीया प्लॅटफार्मवर आजुबाजूचे परीसरात तसेच लगतच्या मध्यप्रदेश परीसरात प्रसारीत करण्यात आले. त्याचा फायदा होवून परतवाडा येथील एका स्थानिक यु ट्युब पत्रकाराने सदर महिला हि परवताडा जवळील गळंकी येथे राहणारी असल्याची शक्यता आहे असे सांगितले. अशी माहीती मिळाल्यावरुण त्याबाबत स्थागुशा पथकाने खात्री केली असता मृत महिलेच्या भावाने सदर प्रेताचे फोटोग्राफ पाहुन सदर महिला हि त्याची बहिन दुर्गा विशाल श्रोती वय २७ वर्ष हि असल्याचे सांगुन ती मागील ७ ते ८ दिवसापासून घरी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर परीसरात अधिक विचारपुस केली असता दुर्गा हिचे गावातीलच अनिल जांभेकर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले. त्यावरुण स्थागुशा पथकाने अनिल जांभेकर यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने दुर्गा सोबत असणा-या त्याच्या प्रेमसंबंधाची माहीती देवुन मृतक हि त्यास खर्चासाठी वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने त्यांचे नेहमी भाडण व्हायचे व दिनांक ०५/०७/२०२५ रोजी राजी दरम्यान सुध्दा अश्याच झालेल्या भांडणातुन रागाच्या भरात तिचा गळा आवळुन मारुन टाकल्याचे आणी प्रेताचे हातपाय बांधुन, प्रेत ब्लॅकेटमध्ये गुंडाळुन मोटर सायकलवर बांधुन शिरजगाव ते ब्राम्हणवाडा रोडवरील नाल्यात फेकुन दिल्याची कबुली दिली.

आरोपीने दिलेल्या कबुली वरुण स्थागुशा पथकाने त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा यांचे ताब्यात दिले. सदर प्रकरणी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा येथे अपराध क्र.२६९/२५ कलम १०३(१), २३८ (ब) भा.न्या. संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, मा.श्री. पंकजकुमार कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा., मा. श्री. शुभम कुमार सहा. पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. किरण वानखडे यांचे नेतृत्वात सहा. पो. निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, सागर नाठे, शांताराम सोनोने, सायबर विभागाचे सागर धापड, चालक निलेश आंवडकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट