मोखाडा पोलीस ठाणे येथील दाखल खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

पालघर: दि.१२/१२/२०२२ रोजी यातील मयत नामे बळवंत शंकर गारे वय ५७ वर्षे रा. पळसुंडा, ता.मोखाडा, जि. पालघर हे शेतात कामाला जातो असे सांगून गेले. ते नेहमीप्रमाणे परत न आल्याने नातेवाईकांनी आजूबाजूच्या परीसरात शोध घेतला असता दि. १४/१२/२०२२ रोजी सकाळी ०६:०० वा. चे दरम्यान पळसुंडा गावाजवळ ता. मोखाडा, जि. पालघर येथे मयत स्थितीत मिळून आल्याने मयत यांची पत्नी फिर्यादी नामे श्रीमती कमल बळवंत गारे, वय ५२ वर्षे यांनी फिर्याद दिली की, फिर्यादी यांची चुलत सासु तान्हीबाई शिवराम गारे हिचे शेतातील तुरीच्या शेंगा संशयीत इसम नामे
१) वय २६ वर्षे,
२) वय २४ वर्षे दोन्ही रा. पळसुंडा, ता. मोखाडा, जि. पालघर यांनी चोरल्या होत्या. या कारणावरुन मयत याने संशयीत यांना दि.०६/१२/२०२२ रोजी मारले. या गोष्टीचा मनात राग धरून संशयीत इसम यांनी मयत याच्या पायावर व कपाळावर कोणत्यातरी जड वस्तुने उपटी मारून गंभीर दुखापती करून त्यांना जिवेठार मारले अशा आशयाची फिर्यादी यांनी फिर्याद दिली म्हणून मोखाडा पोलीस ठाणे येथे १५६ / २०२२ भादवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक पालघर, यांच्या आदेशान्वये श्री. संजीव पिपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर व श्री. संजय ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक मोखाडा पोलीस ठाणे यांची तपास पथके तयार केली.

यातील संशयीत इसम यांनी कोणताही पुरावा मागे सोडला नसतानाही पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रीक पध्दतीने तपास करून संशयीत इसम १) वय २६ वर्षे, २) वय २४ वर्षे दोन्ही रा. पळसुंडा, ता. मोखाडा, जि. पालघर यांस ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. नमुद दोन्ही इसमांना दि. १६ / १२ / २०२२ रोजी ००.२० वा. अटक करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास श्री. संजय ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक मोखाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांच्या आदेशान्वये श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणु विभाग, अतिरीक्त चार्ज जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री अनिल विभुते, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पालघर, श्री. संजय ब्राम्हणे, पोलीस निरीक्षक मोखाडा पोलीस ठाणे, पोउपनि/ गणपत सुळे, स्थागुशा पालघर, पोउपनि / संजय भुसाळ, मोखाडा पोलीस ठाणे, पोहवा / २०१ दिलीप जनाठे, पोहवा / ८९४ विजय ठाकुर, पोहवा / ३७९ राकेश पाटील, नेमणुक स्थागुशा पालघर पोहवा / ११२० भास्कर पोहवा / १६२४ प्रदिप विटकर, नेमणपुक मोखाडा पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट