२ हात व २ पाय बांधलेले अनोळखी मृतदेह पुलाखाली सापडल्याने पोलीस स्टेशन शिरजगाव कसबा येथील विभागात भीतीचे वातावरण..

सह संपादक -रणजित मस्के
अमरावती

आज दिनांक 10/07/2025 रोजी शिरसगाव ते ब्राह्मणवाडा थडी रोडवर असलेल्या लहान पुलाखाली एक ब्लॅंकेटच्या आत अनोळखी महिलेचा मृतदेह दुपारी २:३० वा. दरम्यान मिळून आला आहे.
सदर महिलेच्या अंगात पिवळ्या रंगाचे ब्लाऊज व पिवळ्या रंगाची साडी घातलेली आहे. महिलेच्या हातात काचेच्या हिरवट सोनेरी बांगड्या व पायात पैजण ( तोरड्या) आहेत. मृतदेहाचा बाजूला चप्पल मिळून आली आहे.
सदर महिलेचे दोन्ही हात व दोन्ही पाय कपड्याने बांधलेल्या अवस्थेत असून गळा कपड्याने आवडल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
प्राथमिक दृष्ट्या पाहणी केली असता महिलेचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष दरम्यान असण्याची शक्यता असून मृतदेह चार ते पाच दिवसा पूर्वीचा असल्याचे दिसून येत आहे.
सदर महिलेच्या उजव्या हातावर A.M. दुर्गा तसेच *Anil * असे गोंदलेले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर माननीय श्री. पंकज कुमावत,अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण, श्री शुभम कुमार, सहाय्यक पोलीस अधीक्षक , अचलपूर उपविभाग तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
सद्यस्थितीत मृतदेह शवाविच्छेदनाकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे ठेवण्यात आलेला असून पोलीस स्टेशन शिरसगाव येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.