कशेडी घाटात आढळलेल्या मृतदेहाचे खुनी पोलादपूर पोलीसानी केला गजाआड..!

सह संपादक -रणजित मस्के
पोलादपूर

पोलादपूर पोलिसांनी आरोपींचे “हाईड एंड सीक” संपवले.
पोलादपूर (जि. रायगड) –
पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील काशेडी घाटात, मे महिन्यात एक अज्ञात मृतदेह सापडल्याची घटना समोर आली होती. या संदर्भात पोलादपूर पोलीस ठाण्यात एकूण ०३ आरोपीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक व मानवी गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने एका संशयित आरोपीस अटक केली. पुढील तपासामध्ये या खुनामध्ये मुख्य दोन आरोपींचा सहभाग उघडकीस आला. हे दोघे आरोपी तब्बल दोन महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमाभागात लपून राहत होते.
तरी पोलादपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे व मानवी गुप्त माहितीच्या आधारे खालील दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले:
• वंदना दादासाहेब पुणेकर (वय ३६)
• मोहन पांडुरंग सोनार (वय ५४)
या दोघांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.कलम – १०३(१),२३८,३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी श्रीमती.आंचल दलाल,पोलीस अधीक्षक,रायगड यांचे आणि श्री.अभिजीत शिवथरे,अपर पोलीस अधीक्षक,रायगड यांचे मार्गदर्शनखाली आणि श्री.शंकर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी,महाड यांचे नेतृत्वात आनंद रावडे,पोलादपूर पोलीस ठाणे यांचेसमवेत पथकातील पो.हवा/८७३ तुषार सुतार , पोना/१३६९ अनुजित शिंदे, मपोशी/२५० बनसोडे यांनी केली आहे.