कोरेगावपार्क पोलीसांनी शस्त्रांचा धाक दाखवुन जबरदस्तीने मोबाईल चोरी करणा-या अट्टल चोरटयांना १२ तासाच्या आत केले जेरबंद

0
WhatsApp Image 2025-07-08 at 4.33.31 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

मा. वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गु.र.नं. ६१/२०२५ भा.न्या.सं.क. ३०९(४).३ (५),११५,३५१(१), भारतीय शस्त्र अधिनियम कायदा कलम ४(२५) अन्वये दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना. उपास पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी नामे १) सिध्दार्थ उमेश मोरे, वय.१९ वर्षे, रा. राजरत्न बुध्दविहार शेजारी, ताडीवाला रोड, पुणे २) कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी चनगर, वय.२१ वर्षे, रा. ताडीवाला रोड, मारुती मंदीराजवळ, बंडगार्डन, पुणे, ३) आर्यन संभाजी वाघमारे, वय.१९ वर्षे, रा. लोकसेवा वसाहत, गल्ली नं.०२, घर.३५, ताडीवाला रोड, पुणे ४) एक विधीसंघर्षीत बालक यांच्याबाबत पोलीस अंमलदार वेताळ यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाल्याने तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरक्षिक चव्हाण, व स्टाफ असे खाजगी वाहनांने क्वीन्स गार्डन रेल्वे पटरीच्या बाजुला कोरेगावपार्क, पुणे येथे गेले.

सदर ठिकाणी बातमीदाराने सांगितलेल्या वर्णानाप्रमाणे चार संशयीत इसम सदर ठिकाणी दिसुन आले असता त्यास हटकले असता सदर संशयास्पद इसमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तपास पथकातील अंमलदार यांनी शिताफीने पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आपली नावे १) सिध्दार्थ उमेश मोरे, वय १९ वर्षे, रा. राजरत्न बुध्दविहार शेजारी, ताडीवाला रोड, पुणे २) कृष्णा उर्फ विकी टिमरेड्डी धनगर, वय २१ वर्षे, रा. ताडीवाला रोड, मारुतीमंदीराजवळ, बंडगार्डन, पुणे, ३) आर्यन संभाजी वाघमारे, वय १९ वर्षे, रा. लोकसेवा वसाहत, गल्ली नं.०२, घर. ३५, ताडीवाला रोड, पुणे ४) एक विधीसंघर्षीत बालक वरील प्रमाणे सांगुन वरिल गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यांना अटक करुन सदर गुन्हयांच्या तपासा दरम्यान त्यांच्याकडुन ०४ मोबाईल, एक सुझकी कंपनीची बर्गमेन मोपेड दुचाकी, एक धारदार शस्त्र, ३००/-रू. रोख रक्कम असा एकुण १,५०,०००/- रू किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन ०३, वानवडी पो.स्टे ०१, असे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी ही मा., अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर श्री. मिलींद मोहिते, गा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग पुणे, श्री. अतुल नवगिरे, यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगावपार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. सुनिल थोपटे, पोनि (गुन्हे), श्रीमती संगीता जाधव, याचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार हरुन पठाण, मयुर शिंदे, प्रविण पडवळ, सदीप जडर, राहुल वेताळ, राहुल मोकाशी, योगेश सोनवणे, अमित जाधव, अकुश खडसोळे यांचे पथकाने तपास करुन प्रशसनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट