अमली पदार्थ विकणारा मुख्य तस्करी मोहम्मद सलीम शेख उर्फ फरान मानपाडा पोलीसांच्या जाळ्यात..

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

कल्याण ठाणे

दिनांक ३ ” मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांनी डाउन टाउन, खोणी पलावा परिसरात १.९३ किलो मेफेड्रॉन (एमडी) कि.अं २.१२ करोड रूपयांचे अंमली पदार्थ मिळुन आलेल्या दाखल गुन्हयातील मुख्य फरार आरोपी बाहेरील देशात पळुन जात असताना राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथुन अटक करण्यात आली.
मानपाडा पोलीस ठाणे गु.र.नं ७३१/२०२५ गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २१ (क) २२ (क) प्रमाणे दिनांक २७/०६/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्हयात दोन पुरूष आरोपी नाव. १) असिल जाबर सुर्वे वय २६ वर्षे २) मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी व एक महीला आरोपी नाव मेहेर फातिमा रिजवान देवजानी असे तीन आरोपींना यापुर्वी अटक करण्यात आलेली होती.

सदर गुन्हयातील मुख्य आरापी नाव मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान हा गुन्हा दाखल झाल्यापासुन फरार होता.
दिनांक २९/०६/२२०२५रोजी सदर गुन्हयातील मुख्य आरापी नाव. मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरान हा बाहेरील देशात पळुन जात असताना त्यास राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, हैद्राबाद येथे ताब्यात घेवुन अटक करण्यात आलेली असुन त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक ०७/०७/२०२५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आले.

  तसेच मुख्य आरापी नाव मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फरहान हा वेगवेगळया देशात जात असल्याची माहीती मिळत असुन त्याचे विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे येथे गु.रजि. नंबर १५७०/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम ४८२ सह गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २९, २२ (क) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, संजय जाधव, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग, सुहास हेमाड, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, सपोनि/कलगोंडा पाटील, सपोनि संपत फडोळ, सपोनि/महेश राळेभात, सपोनि/सागर चव्हाण, पोशि/१३३१ मिननाथ बडे, पोशि/८१८९ किशोर दिघे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट