खंडणी विरोधी पथक ठाणेकडुन अवैधरित्या बेकायदेशीरपणे गावठी दारु हातभटटी उध्दवस्त करुन एक इसमास घेतले ताब्यात

0
Spread the love

सह संपादक -रणजित

ठाणे

दिनांक 03/07/2025 रोजी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पथकास गुप्त बातमीदाराकरवी माहीती मिळाली की, ‘‘ इसम आदेष पंडीत गायकर, रा. सत्संग भवनाचे शेजारी, मलंगगड रोड, व्दारली पाडा, ता. अंबरनाथ, जि. ठाणे. हा व्दारली पाडा ता. अंबरनाथ जि ठाणे हा अवैधरित्या बेकायदेषीरपणे गावठी हातभटटीचे दारूची निर्मीती करीत आहे.’’ मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने दिनांक 03/07/2025 रोजी 13.15 वा. जय गोलोबा चाळ समोर, मोकळया मैदानात, व्दारली पाडा, ता. अंबरनाथ जि. ठाणे याठिकाणी पोलीस पथकाने छापा कारवाई करून इसम नामे आदेष पंडीत गायकर, वय 24 वर्षे, धदा – दारू निर्मिती रा. स्वतःचे घर, सत्संग भवनाचे शेजारी, मलंगगड रोड, व्दारली पाडा, ता. अंबरनाथ, जि. ठाणे हा अवैधरित्या बेकायदेषीरपणे गावठी हातभटटीचे दारूची निर्मीती करण्यासाठी लागणारे साहीत्यासह हातभटटी लावून हातभटटीवर गावठी दारु तयार करीत असतांना 3,15,950/- रू. किमंतीच्या गावठी दारू व साहित्यासह मिळुन आल्याने त्याचेविरूध्द हिललाईन पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर 428/2025 महाराष्ट्र प्रोव्हिबिषन 1949 कलम 65 (ब), 65 (क), 65 (ई), 65 (फ) प्रमाणे गुन्हा दिनांक 03/07/2025 रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. आषुतोष डंुबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), ठाणे शहर मा. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, मा. शेखर बागडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध 1, गुन्हे शाखा, ठाणे तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक मा. विनायक घोरपडे, सहायक पोलीस आयुक्त, शोध -2, गुन्हे शाखा, ठाणे, यांचे मार्गदर्षनाखाली सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोपि/भुषण कापडणीस, पोउपनिरी/सुहास तावडे, सपोउपनिरी/संदीप भोसले, पोहवा/4044 ठाकुर, पोहवा/1015 पाटील, पोहवा/शिंदे पोहवा/1510 गायकवाड, पोहवा/270 जाधव, पोहवा/1416 गडगे, पोहवा/4184 राठोड, पोहवा/18 कानडे, मपोहवा/4466 पावसकर, मपोहवा/6722 कांबरी, पोना/1925 हासे, पोना/7079 मधाळे, चापोना/7312 हिवरे, पोषि/3213 वायकर, पोषि/8246 ढाकणे, पोषि/2640 पाटील, पोषि/1984 शेजवळ, मपोषि/8101 भोसले यानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट