खडक पोलीसांनी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार साहिल खाण यास अग्नीशस्त्रासह केले जेरबंद..
सह संपादक -रणजित मस्के
पुणे

सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत वाढते गुन्हयांना प्रतिबंधक घालण्याचे दृष्टीकोनातुन श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना गुन्हे प्रतिबंधक व कायदा सुव्यवस्थेतेबाबत सूचना दिल्या आहेत. खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करण्याच्या सक्त सूचना मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो, श्री. शशिकांत चव्हाण यांनी दिल्या आहेत. दिनांक ०१/०७/२०२५ रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग तसेच संशयित इसम चेक करीत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे साहील खान रा. एकबोटे कॉलनी लोहीयानगर पुणे याचेकडे पिस्टल असुन तो शारदा हॉस्पीटल, एकबोटे कॉलनी ट्रॅकऑन कुरिअर शॉप समोर, घोरपडी पेठ पुणे याठिकाणी उभा आहे, अशी बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे यांना कळविले असता त्यांनी ती मा. वरिष्ठांना कळविले असता वरिष्ठांनी सदर बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस हवालदार हर्षल दुडम, पो. हवा ठवरे, पो.शि. बाबळे, पो.शि. गायकवाड, पो.शि. दिवटे, पो.शि. केदारी असे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे साहिल खान रा. शारदा हॉस्पीटल, एकबोटे कॉलनी ट्रॅकऑन कुरिअर शॉप समोर, घोरपडी पेठ पुणे याठिकाणी उभा असलेला दिसला त्याची व स्टाफची नजरानजर होताच ते त्या ठिकाणाहून नजर चुकवुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतानच त्याला स्टाफचे मदतीने पाठलाग करून काही अंतरावर शिताफीने पकडून त्यास त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव साहील मजिद खान, वय २८ वर्षे, रा.२८८ घोरपडे पेठ भावसार मंगल कार्यालयाजवळ एकबोटे कॉलनी लोहीयानगर पुणे असे सांगितले. त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता साहिल मजिद खान याचे पॅन्टमध्ये कंबरेस डाव्या बाजुस खोचलेले एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह व त्याचे नेसते पँटचे खिशात ०१ जिवंत राऊंड मिळुन आले. त्याचेकडील एक लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल मॅगझीनसह त्याची प्रत्येकी किंमत ५५,०००/-रूपये व ०१ जिवंत राऊंड त्याची किंमत रुपये १,०००/- किंमतीचा असा एकूण ५६,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे हे करीत आहे.
नमूद अटक आरोपी यांचेविरुध्द खालील गुन्हे दाखल आहेत.
१) खडक पोलीस ठाणे गु.र.नं. १९७/२०२४ भा.द.वि. कलम ३२६,५०४,५०६
२) खडक पोलीस ठाणे गु.र.नं. ४२४/२०२४ ऑर्म अॅक्ट ३(२५), मपोका कलम ३७(१) सह १३५
नमूद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. ऋषीकेश रावले पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, विश्वजित गोरे, योगेश चंदेल, निलेश दिवटे, शोएव शेख, मयूर काळे, विकास पांदळे यांचे पथकाने केली आहे.
