पालघर पोलीस दलातील १४ ASI , ७ पोलीस हवालदार व ८ पोलीस नाईक/ शिपाई यांना पदोन्नती प्रदान..

उपसंपादक -मंगेश उईके
पालघर
महाराष्ट्र शासनाचे प्रचलित धोरणानुसार राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना रिक्त होणाऱ्या पदामध्ये नियमानुसार पदोन्नती देण्याचे निर्देश आहेत.


पालघर पोलीस दलात रिक्त असलेल्या पदावर पदोन्नती देण्यासाठी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे अध्यक्षतेखाली श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर, कार्यालयीन अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर यांची समिती गठीत करण्यात आलेली असून जिल्हयातील पदोन्नतीस पात्र सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस अंमलदार यांची पात्रता व अपात्रता पडताळणी करून खालील नमुद एकुण २९ पोलीस अंमलदार यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे.
१) १४ सहाय्यक पोलीस उप निरीक्षक यांना श्रेणी पोलीस उप निरीक्षक (ग्रेड PSI) या पदावर पदोन्नती.
२) ७ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उप निरीक्षक (ASI) या पदावर पदोन्नती.
३) ८ पोलीस नाईक / पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती.
दिनांक ०३/०७/२०२५ रोजी जिल्हयातील पोलीस अंमलदार यांचे पदोन्नती आदेश निर्गमीत करण्यात येऊन पदोन्नती दिलेल्या पोलीस अंमलदार यांना श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.