दरोड्याचा गुन्हा उघड करण्यात पालघर पोलीसांना मोठे यश…

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर ;

पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दि. २४/०६/२०२५ रोजी रात्रीचे ०१.४५ वाजण्याचे सुमारांस मौजे ब्राम्हणगांव, ता. वाडा जि. पालघर येथे अनोळखी इसमांनी घरफोडी चोरी करण्याच्या उद्देशाने फिर्यादी श्री. तुकाराम शिवराम पाटील, वय ८७ वर्षे, रा. ब्राम्हणगाव, पो. कंचाड, ता. वाडा, जि. पालघर यांच्या राहते घराच्या पाठीमागील पडवीची कौले उचकटुन तसेच घराचे हॉलचा मुख्य दरवाजा लोखंडी गजाचे मदतीने उचकटुन त्यावाटे घरात प्रवेश करुन फिर्यादी व फिर्यादीची पत्नीचे हात व पाय बांधून त्यांचे तोंडाला चिकटपट्टी लावुन घरातील सर्व कपाट व बेड उचकटुन घरामध्ये मौल्यवान वस्तुंची व पैशांची शोधाशोध करुन दरोडा टाकून निघुन गेले. सदर बाबत वाडा पोलीस ठाणे गु.र.नं. २७४/२०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियक कलम ३१० (२), ३१२, ३३३, ३३१ (२), ६२, १२७ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी सदर गंभीर गुन्हयाची योग्य ती दखल घेवुन पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांचे नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील विशेष पथकाने नमुद गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून सुचनांप्रमाणे गुन्हयाची माहिती घेवुन तांत्रीक मदतीने व गुप्त बातमीदारांचे मार्फत माहिती मिळवुन वाडा, पडघा, भिवंडी परिसरात अधिक तपास करुन खालील नमुद संशयीत इसमांना तपासकामी ताब्यात घेतले.

१) वैभव दिलीप संगारे, वय ३४ वर्षे, रा. साईराम नगर बापगांव ता. भिवंडी जि. ठाणे,

२) विनोद नामदेव पाटील, वय ३१ वर्षे, रा. लोणाड ता. भिवंडी, जि. ठाणे,

३) भुषण दिपक धुमाळ, वय ३७ वर्षे, रा. निंबवली पो. खडवली, ता. कल्याण जि. ठाणे,

४) सनी साईनाथ पष्टे, वय २१ वर्षे, रा. कांदली, पो. पाश्चापुर, ता. भिवंडी जि. ठाणे,

५) प्रतीक अरुण पष्टे, वय २३ वर्षे, रा. कांदली, पो. पाश्चापुर, ता. भिवंडी जि. ठाणे,

६) महेश रमेश जाधव, वय २० वर्षे, रा. ब्राम्हणगांव ता. वाडा, मुळ गांव बोट पुंजारपाडा ता.जि. पालघर वरील इसमांकडे गुन्हयाचे अनुषंगाने कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात दि. ०३/०७/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायालय, वाडा येथे हजर करण्यात आले असुन त्यांची दि. ०७/०७/२०२५ रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर आहे. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली इर्टीगा व व्हॅग्नर कार तसेच आरोपींचे ०६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक श्री. सुमेध मेढे, नेमणूक वाडा पोलीस ठाणे हे करीत आहेत.

यातील २ आरोपीत यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अ.क्र. आरोपीचे नाव
पोलीस ठाणे
गु.र.नं.
भादंविसं कलम
१.वैभव दिलीप संगारे
पडघा १०६/२०१५
१४७, १४८, १४९, ३२६, ४२७, ४५२, ५०४, ५०६ प्रमाणे.
२.भुषण दिपक धुमाळ
कल्याण ता.
०१/२०१४,
१४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३४, ३४१, ४२७ प्रमाणे.
पालघर
१४७/२०२१ ३०७, ३४ सह आर्म अॅक्ट ३ प्रमाणे.

सदरची कारवाई पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग, श्री. गणपतराव पिंगळे यांचे मार्गदर्शनानुसार पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर, पोनि/दत्तात्रय किंद्रे, नेम. वाडा पोलीस ठाणे, पोउनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोउनि / रविंद्र वानखेडे, पोउनि गोरखनाथ राठोड, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोअमं/नरेंद पाटील, पोअमं/विशाल कडव, पोअमं/महेश अवतार, नेम. स्थानिक गुन्हे शाखा पालघर तसेच म. पोउनि/रुपाली गुंड, पोअमं/रोहीत तोरस्कर, म. पोअमं/स्नेहल शेलार नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट