हडपसर पोलीसांनी ४ चाकी गाडीमध्ये येवून घरफोडी करणारे आरोपीना केले जेरबंद..

सह संपादक -रणजित मस्के
हडपसर

त्यांचेकडून सोन्या-चांदिचे दागिने असा एकुण ३७,००,०००/-रू. कि. चा मुद्देमाल केला जप्त.
दि. १४/०६/२०२५ रोजी फिर्यादी हे राहते घराला लॉक करुन तूळजापूर अक्कलकोट येथे गेलो असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराचे लॉक तोडून घरात प्रवेश करून घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी चोरी करून नेल्याने हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ५७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३),३०५,३१७ (२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवण्यात आली. हडपसर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार दिपक कांबळे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, यांनी फिर्यादी यांचे सोसायटी मध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणीकरून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त केले.
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण मागातील ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. त्या दरम्यान अधिक प्राप्त झाले फुटेज मधून आरोपी हे लवळे भागात गेले असल्याचे दिसून आले. संशयीत इसमांचे प्राप्त फुटेज आधारे सदर भागात केले अधिक तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहीती हडपसर तपास पथकास मिळून आली. त्याआधारे संशयीत १) गणेश अर्जुन पुरी वय ३३ वर्षे रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी झेड कॉर्नर मांजरी पुणे. मुळ ममदापुर पाटी हनुमान मंदिराजवळ, ता. लातुर जि. लातुर ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे केले तपासात त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारासह केल्याची कबुली दिली. त्याआधारे २) रविसिंग शामसिंग कल्याणी वय २७ वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी हडपसर पुणे, ३) निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी वय ४४ वर्षे रा.मु.पो. वांगणी ता. अंबरनाथ जि. ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीकडे गुन्हयाबाबत अधिक चौकशी केली असता तपासातील हकीगत अशी की, आरोपी यांनी गुन्हा करण्या करीता टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला. सदर गाडी ही सुमारे ८-१० महिन्यापुर्वी आरोपी याच्या भावाने विकत घेतो असे सांगून घेतली होती परंतु सदरगाडी ही नावावर केली नव्हती. तसेब आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्त करून बनावट नंबर प्लेट गाडीला लावली होती.
तसेच तपासा मध्ये माग लागू नये या करीता घरफोडी करून दिशाभूल करण्यासाठी आरोपी हे वरिल मार्गाने गेल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. आरोपींकडे केले कौशल्य पुर्ण उपासात त्यांचे कडून १) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५७०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३),३०५.३१७ (२), ३ (५), २) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५६९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१ (३),३०५,३१७ (२), ३ (५) ३) कोरेगाव पार्क पोलीस ठाणे गु.र.नं ५८/२०२५ भा.न्या. सं. कलम ३३१ (४),६२,३ (५) ४) सीडको पोलीस स्टेशन संभाजी नगर शहर ४४/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) असे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून आता पर्यंत एकुण ३७,००,०००/-रू. किं. चा माल जप्त केला असून त्यामध्ये किं. रू २२,५०,०००/-रू.किं. चे सोन्या-चांदीचे दागिने तसेच १४,५०,०००/-रू.किं.ची गुन्ह्या करीता वापर केलेली नेक्सॉन गाडी, हंटर मोटारसायकल असा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व पोलीस अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, अमोल जाधव यांचे पथकाने केली आहे.