खडक पोलीसांनी अवैध गुटखा साठयावर मोठी कारवाई करून ५ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त केला…

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

सदर बाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलीरा आयुक्तालयाचे हद्दीत अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी सर्व पोलीस ठाणेना सूचना दिल्या आहेत, खडक पोलीस स्टेशन चे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार लोंढे यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे तपास पथकातील प्रभारी अधिकारी श्री. अर्जुन कुदळे, प्रल्हाद डोंगळे व तपास पथकातील स्टाफ पोहया २८४२ दुडम, पोहवा ९१५ ठवरे, पो.हवा. ७४४९ फरांदे, पो.शि. ४९९४ गायकवाड, पोशि ५०३० दिवटे, पो.शि. ४४३० गोरे असे खडक पोलीस स्टेशन पुणे शहर हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार २८४२ हर्षल दुडम यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषगाने लोहियानगर गल्ली नं-०१ राम मंदिर जवळील पठाण पान शॉप मध्ये अवैद्य गुटखा विक्री चालु असल्याचे निदर्शनास आल्याने दुकानावर छापा घातला असता सदर दुकानामध्ये प्रतिबंधीत गुटखा पान मसाला असे एकुण मिळून ४.८७,२०४/-रुपये किंमतीचा मुद्येमाल प्रतिबंधीत पदार्थाची विक्री करीता साठवणूक करून मिळून आला. त्या अनुषंगाने खडक पोलीस स्टेशनला दिनांक २५/०६/२०२५ रोजी गुन्हा रजि. नं. ३२४/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३.२२३,२७४,२७५.३(५) व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३०(२) (अ), ३१(१), २६ (२) (1) २६(२) (IV) अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन अॅन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २.३.४ चे उल्लंघन केले आहे. तसेच सह वाचन ३ (1) ZZ चे उल्लंघन केल्याने ५९ वे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयात गुटखाधारक चालक आरोपी नामे रियाज नुर खान, वय ४० वर्षे, धंदा पान टपरी चालवणे, पत्ता- ५४ ए.पी., लोहीयानगर, गल्ली नं ०१, राममंदीर, पुणे, यांचेविरुध्द वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपी यांनी गुटखा कोठून आणला, कोणाकडून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केला, व पोलीस ठाणे हद्दीमध्ये अजून कोणाकडे अवैध गुटखा सुरू आहे सदर आरोपी याला मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने आरोपीला ०२ दिवस पोलीस कोठडी ठोठावली होती. सध्या आरोपी याला मा. कोर्टाने न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. सध्या पाहिजे आरोपीचा शोध घेवून गुटख्याची पुढील चेन उध्दवस्त करण्याचे काम सुरू आहे. तरी याबाबत पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, खडक पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
नमूद कारवाई श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे व सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनघा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण व पोलीस निरीक्षक श्रीमती शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अनिल फरांदे, अक्षयकुमार याबले कृष्णा गायकवाड, शुभम केदारी, विश्वजित गोरे, योगेश चंदेल, निलेश दिवटे, शोएब शेख, मयूर काळे यांचे पथकाने केली आहे.