दरोड्याच्या गुन्ह्यात पोलीस अंमलदारावर वार करून फरार असलेला आरोपी फिरोजखां दुलहोत उर्फ मेवाती अखेर पुणे युनिट ६ च्या जाळ्यात…

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

दिनांक २२/१०/२०२४ रोजी डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत प्रनात मार्शल नाईट पेट्रोलिंग करत असताना सहा अनोळखी इसम यांनी त्यांचे कडील धारदार हत्यारांसह दरोड्या सारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशात असताना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी सदर प्रभात मार्शलचे पोलीस अंमलदाराचे हाताचे पोटरीवर धारदार हत्याराने वार केला होता. त्यावेळी पोलीस अंमलदार यांनी स्वसंरक्षणासाठी त्यांचेकडील शासकीय पिस्टल मधुन दोन राउंड आरोपींचे दिशेने फायर केले. त्यावेळी दोन आरोपी जखमी झाले होते. अंधाराचा फायदा घेवुन आरोपी पळून गेले होते. सदर बाबत डेक्कन पो. स्टे. गु. २. नं. १७१/२०२४, मा.न्या.सं. कलम ३१० (१), १२१ (१), १३२ सह भारतीय हत्यार कायदा ४ (२५) सह म. पो. कायदा ३७ (१) (३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील एका आरोपीस यापुर्वी गुन्हे शाखा व डेक्कन पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली होती व इतर पाच आरोपींना मा. न्यायालयाने फरारी घोषीत केले होते.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना दिनांक ०१/०७/२०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांना वा गुन्हयातील पोलीस अंमलदारांवर वार करणारा मुख्य फरार आरोपी नामे फिरोजखां शरीफखां दुल्होत उर्फ मेवाती, वय ३४ वर्षे, रा. झंजाळा, पोस्ट-अंबई, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर हा नाशिक येथे येणार असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर बातमीच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ सहा. पोतीस निरीक्षक राकेश कदम, पोलीस अंमलदार सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे व सचिन पवार वांना नाशिक येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने स्थानिक भद्रकाली पोलीस स्टेशनच्या मदतीने नमूद आरोपीतास बी. डी. मालेकर मैदान, कान्हेरेवाडी, नद्रकाली, नाशिक येथून सापळा रचून ताब्यात घेतले आहे. नमूद आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. नमूद आरोपीतास मा. वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कारवाई कामी डेक्कन पो. स्टे. यांचे वाब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा, पुणे शहर अति. कार्यभार (गुन्हे) श्री. विवेक नासाळ मा. सहाव्याक. पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण सहा. पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कास्खेले, प्रशांत कापुरे, निरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन घाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं पानसरे, नेहा तापकीर, मांदळे, नरवडे यांनी केली आहे.