पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया दामिनी पथकाची मुली व महिलांच्या संरक्षणात अति उल्लेखनीय कामगिरी…

प्रतिनिधी-रणजित मस्के
गोंदिया: याबाबत थोडक्यात असे की, शाळा, महाविदयालय,परीसरात रोड रोमियो मुलांव्दारे शाळेच्या आवारात गेटसमोर उभे राहून मुलीवर वाईट नजर टाकणे, छेड काढणे, वाईट कमेंट पास करणे, तसेच बस स्थानक, रेल्वे स्टेशन ई. सार्वजनिक ठिकाणी टवाळखोर मुले, यांचेव्दारे युवती व महिलांना होणारा त्रास व छेड काढण्याचे प्रकार तसेच विद्यार्थिनींच्या व महिलांच्या समस्याचे निराकरण करणे व उपायोजना करण्याचे अनुषंगाने छेडछाडीच्या घटनाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक गोदिया, यांनी जिल्हा स्तरावर दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे.



या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख →पो. उप. नि. प्रियंका पवार यांचे नेतृत्वात दामिनी पथक हे बस स्थानक, रेल्वे स्टेशन, परिसरात प्रवाशी शाळकरी मुलींना, महिलांना त्रास देणाऱ्या, रोड रोमिओ, टवाळखोरांचा त्या ठिकाणी जावून धडक मारून छेडछाडीचे प्रकार दिसताच टवाळखोरांना धडा शिकविणार असून मुली, महिलांवर वाईट नजर ठेवणाऱ्या रोड रोमिओ व छेडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणे, शाळा, महाविद्यालय येथे मार्गदर्शन करण्याची दामिनी पथकाचे कार्य व मोहीम सुरू आहे.

या अनुषंगाने वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथक दिनांक 13/12/2022 रोजी गोंदिया शहर,रामनगर परिसरात गस्त , शाळा., कॉलेज भेटी, मुलींना मार्गदर्शन करीत असताना सूर्याटोला बांधतलाव परिसरात आत्महत्या करण्याचे इराद्याने आलेल्या मुलीचे मनपरिवर्तन करण्यात आले असून सदर मुलीस तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


सदरची कामगीरी मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील पो. उप. नि प्रियंका पवार, LPC बन्सोड, LPC मजुटे , चालक LPC पाचे, PC बावनकर, PC अंबादे, यांनी केली आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की, शाळकरी मुली, महिलांची छेड काढणाऱ्या, त्रास देणाऱ्या ची माहिती खालील Toll फ्री क्र.. 112. व्हाट्सअप क्र. 9130030548. वर देण्यात यावी.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com