मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई – १.९३ किलो मेफेड्रॉनसह २.१२ कोटींचा अमली पदार्थ जप्त, तीन आरोपी अटकेत.
प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
डोंबिवली ठाणे
दि.२७ डोंबिवली: डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत एक मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी डाउन टाउन, खोणी, पलावा परिसरात छापा टाकून तब्बल १.९३ किलो मेफेड्रॉन (एम.डी.) असा अंदाजे २.१२ कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.
अटक आरोपींची माहिती:
- पुरुष आरोपी – वय २६ वर्षे
- पुरुष आरोपी – वय २० वर्षे
- महिला आरोपी – वय २१ वर्षे गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, २६ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजता, मानपाडा पोलिसांनी डाउन टाउन परिसरात सापळा रचून छापा टाकला. यावेळी आरोपी क्र. १ याच्याकडून १.९३ किलो एम.डी. हस्तगत करण्यात आले. या आरोपीच्या सांगण्यानुसार त्याचे दोन साथीदार पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या दोघांनाही रातोरात अटक केली. तपासात हे उघड झाले आहे की, अटक केलेले आरोपी महिला साथीदाराच्या मदतीने अमली पदार्थाची विक्री करीत होते. गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अमली पदार्थांबाबत कोणतीही गोपनीय माहिती असल्यास, कृपया मानपाडा पोलीस ठाणे (फोन: ०२५१-२४७०१०४) किंवा अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कल्याण यांच्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची गोपनीयता पूर्णपणे राखली जाईल. यशस्वी कारवाईसाठी पुढील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व पथकाचे सहकार्य: पोलीस आयुक्त – आशुतोष डुंबरे, सह आयुक्त – ज्ञानेश्वर चव्हाण,अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) – संजय जाधव, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ३) – अतुल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त (डोंबिवली) – सुहास हेमाडे ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, सपोनि कलगोंडा पाटील, सपोनि संपत फडोळ, आणि पोशि बडे व दिघे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली आहे.