महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापूरुषांच्या केलेल्या अवमानाबद्दल वंचित आघाडीच्या वतीने महाड मध्ये जाहीर निषेध…
प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: महाराष्ट्र राज्याचे तंत्र शिक्षणमंत्री भाजपा चे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील महात्मा ज्योतीराव फुले, अशा महापुरुषांच्या संदर्भात शाळा चाळविण्यासाठी भीक मागत होते असे अपशब्द वापरल्याने या महापूरुषांचा एक प्रकारे अवमानच आहे.
या महापुरुषांनी महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेसाठी शाळा महाविद्यालय खुले करून दिली. व शिक्षणाचे महत्व करून दिले अशा थोर महापुरुषांनबद्दल भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचा अवमान करणे कितपर्यंत योग्य आहे या संदर्भात महाड तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे येथे बुधवार दि.14 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष सखाराम सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी महापुरुषांच्या बद्दल अवमान केलेल्याला मंत्र्यांची हाकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली महाड शहर पोलीस स्टेशनं व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले या मोर्चाला रायगड महिला उपाधक्षा विद्या जाधव, भगवान गायकवाड, तुळशीदास गायकवाड, विठ्ठल धोत्रे, सोनू कासारे, सकपाल, सरकटे मॅडम व बहुसंख्य वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
