मुळेगाव तांडा परिसरात हातभट्ट्या उध्वस्त सोलापूर ग्रामीण स्था.गुन्हे शाखेची कामगिरी

0
WhatsApp Image 2025-06-26 at 9.09.58 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सोलापूर :

सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कार्यक्षेत्रातील मुळेगांव तांडा, भानुदास तांडा येथे चोरुन चालणाऱ्या अवैध गावठी देशी दारुची हातभट्टया उध्दवस्त करुन एकूण 10,11,100/- रु. किंमतीचा गुळमिश्रित रसायन साठा व हातभट्टी दारु जप्त करुन जागीच नाश करण्यात आले.

आज दिनांक 26/06/2025 रोजी आषाढीवारी 2025 च्या आनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे 04 पथके तयार करुन सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीतील मुळेगांव तांडा येथील चोरुन चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारुच्या भट्टयांवर छापा कारवाई करणेकामी मा. श्री. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. श्री. प्रितम यावलकर, अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मा.श्री. संजय जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे नेतृत्वाखाली सपोनि विशाल वायकर, सपोनि नागनाथ खुणे, सपोनि विजय शिंदे, व पोसई सुरज निंबाळकर यांचे वेगवेगळे 04 पथके तयार करण्यात आले होते.

मुळेगांव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथे चुलीवरील चालू असलेल्या हातभट्टी दारु तयार करणेकरीता लागणारे साहित्य तसेच अवैधरित्या दारुची हातभट्टी उध्दवस्त करुन लोखंडी बॅरेल व प्लास्टिक बॅरेल जागीच फोडून नाश करण्यात आले आहे. सदर पथकांनी मुळेगांव तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील अवैधरित्या चालणाऱ्या हातभट्टीवर टाकलेल्या छापा कारवाईत एकूण 04 गुन्हे दाखल करुन एकूण 10.11.100 रु. (10) लाख आकरा हजार शंभर रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये एकूण 26,305 लिटर रसायन व 155 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन जागीच नाश करण्यात आली आहे.

करण्यात आलेली कारवाई:-

1) सपोनि विजय शिंदे व त्यांचे पथकाने मुळेगांव तांडा येथे 01 रेड करुन 28 प्लास्टिक व 02 लोखंडी बॅरेल त्यामध्ये 6000 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 2.26,800 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे. त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 338/2025 महा. दारुबंदी 65(फ) प्रमाणे आरोपी नामे संजय राठोड रा. मुळेगांव तांडा, ता. दक्षिण सोलापूर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) सपोनि नागनाथ खुणे व त्यांचे पथकाने मुळेगांव तांडा येथे 01 रेड करुन 18 प्लास्टिक व 19 लोखंडी बॅरेल त्यामध्ये 7400 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 3,00,800 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे. त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 339/2025 महा. दारुबंदी 65 (फ) (ई) प्रमाणे आरोपी नामे किशोर भोजू जाधव, रा. मुळेगांव तांडा, ता. दक्षिण सोलापूर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

3) सपोनि विशाल वायकर व त्यांचे पथकाने मुळेगांव तांडा येथे 01 रेड करुन 28 प्लास्टिक व 04 लोखंडी बॅरेल त्यामध्ये 6505 लिटर गुळमिश्रित रसायन व 35 लिटर हातभट्टी दारु असा एकूण 2,52,500 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे. त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 340/2025 महा, दारुबंदी 65 (फ) (ई) प्रमाणे आरोपी नामे योगीनाथ हुसेन पवार, रा. मुळेगांव तांडा, ता. दक्षिण सोलापूर तांडा याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4) पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर व त्यांचे पथकाने मुळेगांव तांडा येथे 01 रेड करुन 32 प्लास्टिक व 04 लोखंडी बेरेल त्यामध्ये 6400 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 2.31.000 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जागीच नाश केला आहे. त्याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरनं 341/2025 महा. दारुबंदी 65(फ) प्रमाणे आरोपी नामे संतोष गुरुनाथ राठोड, रा. मुळेगांव तांडा, ता. दक्षिण सोलापूर याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विशाल वायकर, नागनाथ खुणे, विजय शिंदे, सुरज निंबाळकर यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट