खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील गहाळ झालेे 48 अॅन्ड्रॉईड मोबाईल सी.ई. आय. आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात आले

सह संपादक -रणजित मस्के
रायगड



खोपोली पोलीस ठाणेच्या कार्यक्षेञातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या अॅन्ड्रॉईड मोबाईलपैकी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन जवळपास एकुण 48 अॅन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन त्याची एकुण किंमत 8,96,000/- रुपये इतकी आहे. सदरचे मिळुन आलेले अॅन्ड्रॉईड मोबाईल हे आज दिनांक 25.06.2025 रोजी मा.श्रीमती आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, सो. रायगड-अलिबाग यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या अॅन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई.आय. आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले असुन आजपावेतो एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 अॅन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा. अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजीत शिवथरे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. शितल राउत, पोशि/520 अमोल राठोड यांनी केलेली आहे.