महाडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी तर्फे सुषमाअंधारे यांचा जोडे मारून निषेध…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या व उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू देवदेवता तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राज्यभर सर्वत्र जाहीर निषेध होत असताना आता पाहावयास मिळत आहे.
याच अनुषंगाने गुरुवार 15 डिसेंबर रोजी महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला आघाडी तर्फे सुषमा अंधारे यांच्या फोटोला जोडे मारून जाहीर निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी सुषमा अंधारे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांना या महाडच्या पवित्र व ऐतिहासिक भूमीत कदापि पाऊल ठेवू देणार नाही असा निर्धार या महिला आघाडीच्या वतीने यावेळी करण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com