दरोडयाच्या प्रयत्नात असलेले तीन ईसम स्था. गुन्हे शाखा अमरावती कडुन जेरबंद

0
Spread the love

अमरावती

सह संपादक -रणजित मस्के

आरोपी नाव –

१) गोविंद दुर्योधन वाघ वय २५ वर्ष, रा. माताफैल, रेल्वे स्टेशन, बडनेरा

२) हेमंत रवी भुरे वय २४ वर्ष, नवी वस्ती, झंझाडपुरा, बडनेरा

३) प्रेम विनोद चकनारायण वय १९ वर्ष, रा. मात. फैल, रेल्वे स्टेशन, बडनेरा

दिनांक २९/०६/२०२५ रोजी पो.उप.नि. मो. तसलीम, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण चे पथक चांदुर रेल्वे उपविभागात बनावट सोन्याच्या गिझ्या प्रकरणातील आरोपी शोध कामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे. चांदूर रेल्वे हद्दीतील सोनोरा भिलटेक, फाटयाचे समोर अंधारात तीन मोटर सायकलवर ५ ईसम तोंडाला दुपट्टा बांधुन व गाडीच्या नंबरप्लेटला चिकट पट्टी चिकटवलेली असुन नंबर झाकुन संशयीतरित्या उभे आहेत. अशा माहिती वरुन स्था.गु.शा. पथक व पंच असे सोनोरा भिलटेक फाट्याजवळ गेले असता तेथे अंधारात तीन मो.सा. व ५ ईसम हे तोंडाला दुपट्टा बांधुन लपुन उभे असलेले दिसले व त्यापैकी एकाच्या हातात काठी, दोघे मोटर सायकलवर आणि एक ईसम कॉलेज बंग हातात घेवून उभा होता व त्याचे बाजुला एक इसम उभा होता. पोलीस स्टॉपचे मदतीने त्यांना त्या सर्वांना पकडण्याची त्यांचे दिशेने धावलो असता मो.सा. वर बसलेले दोघे ईसम गाडी चालु करुन पळून गेले. व उर्वरित तिघांना जागीच पकडुन त्यांना आमचा परिचय देवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आपले नावे अनुक्रमे १) गोविंद दुर्योधन वाघ वय २५ वर्ष, रा. माताफैल, रेल्वे स्टेशन, बडनेरा २) हेमंत रवी भुरे वय २४ वर्ष, नवी वस्ती, झंझाडपुरा, बडनेरा ३) प्रेम विनोद चक्रनारायण वय १९ वर्ष, रा. माताफैल, रेल्वे स्टेशन, बडनेरा असे सांगीतले. पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन १) लाल रंगाचो कॉलेज बंग कि.अं. २००/-रु २) एक मिरची पुड कि.अं. १०/-रु ३) एक लोखंडी धारदार चाकु कि.अं. २००/-रु ४) दोन मो.सा. चे नंबर प्लेट कि.अं. ००/-रु ५) एक लाकडी काठी कि.अं. ००/-रु ६) दोन वेगवेगळया कंपनीच्या मोटरसायकल कि.अं. १,५०,०००/-रु ७) दोन वेगवेगळया कंपनीचे अॅण्डरॉईड मोबाईल कि.अं. ६०,०००/-रु ८) एक चिकटपट्टी कि.अं. १०/- असा एकूण २,१०,४२०/-रु चा मुद्देमाल आरोपीचे ताब्यातुन जप्त करण्यात आला असुन जप्त मुद्देमाल व तिन्ही आरोपीतांना मुदेमालासह पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपी हे दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मिळुन आले असुन पुढील तपास पो.स्टे. चांदुर रेत्वे करीत आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा., अमरावती ग्रामीण, श्री. किरण वानखडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम, पो.उप.नि. मुलचंद भांबूरकर, अमंलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, चालक पो. कॉ. प्रज्वल राउत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट