अमरावती जिल्हयातील इलेक्ट्रीक तार तसेच शेतातील केबल चोरी करणारी, टोळी स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण यांचे कडुन जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

अमरावती

पो.स्टे.दर्यापुर येथे, दिनांक 01/05/2025 रोजी फिर्यादी नामे नितीन सुधाकरराव थोर वय 37 वर्ष, व्यवसाय नोकरी पॉलीकप इंडीया, रा. मिल कॉलनी परतवाड़ा यांनी रिपोर्ट दिला कि, ते काम करीत असलेल्या कंपनीला कॉंड्रा इनका टेल या कंपनीने गायवाडी ते माहुली घांडे रोड असे अॅल्यूमीनीयम तार 55 एम.एम.चे एकुण 31.5 किलो मिटर खांब्यावरील ताराचे काम पूर्ण करण्या करीता दिले होते. सदर कामावर तक्रारदार हे अधुन मधुन देखरेख करीत होते. दिनांक 28/05/2025 रोजी तक्रारदार व त्यांचे सोबत कोंड्रा इन्फ्रा टेल या कंपनीचे अधिकारी असे देखरेख करीता गेले असता त्यांना गायवाडी ते माहुली धांडे रोड वरील एकुण 31.5 किलो मिटर पैकी गायवाडी ते पृथ्वीराज नगर दर्यापूर पर्यंतचा एकूण 12.5 किलोमीटर अॅल्यूमीनीयम तार व इतर साहित्य एकूण किंमत 5,26,802/- रु. चा कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे दिसून आले अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन दर्यापूर येथे अप क्रमांक 209/2025 कलम 136.139 भा.वि.का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच पो.स्टे. खल्लार येथे दिनांक 28/04/2025 रोजी तक्रारदार नामे सुभाष देवीदासराय सोळंके वय 52 वर्ष, व्यवसाय शेती रा.घडा यांनी रिपोर्ट दिला कि, त्यांचे वडुरा शेत शिवारात 05 एकर शेत आहे व सदर शेतीमध्ये त्यांनी बोअरवेल खोदलेला आहे. सदर वोअरवेल मध्ये इलेक्ट्रीक कनेक्शन देवून त्यामध्ये बोअरला 70 फुट केवल कनेक्शन लावलेले होते. दिनांक 28/04/2025 रोजी तक्रारदार त्यांचे शेतात फेर फटका मारण्याकरीता गेले असता त्यांचे बोअरला लावलेला 50 फुट केबल चोरीला गेल्याचे दिसुन आले तसेच त्यांचे शेताचे वाजूला असलेले सांगवा येथील एकुण 14 शेतकऱ्यांचे बोअरवेल मधील एकुण 1310 फुट केबल कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे दिसले अशा तक्रारदार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. खल्लार येथे अप क्रमांक 89/2025 कलम 303 (2) बी.एन.एस.प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला

सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा. अमरावती (ग्रामीण) यांनी सदर गुन्हे उघड करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांना सुचना निर्गमीत केल्या होत्या.

त्या अनुषंगाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) येथील दर्यापुर उपविभागातील पो.उप.नि.नितीन इंगोले यांचे पथकाला गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक बातमी मिळाली कि, सदरची चोरी ही दर्यापुर येथील दिनेश चव्हाण व गोलु ऊर्फ सागर गुल्हाने यांनी दोन्ही ठिकाणी त्यांचे साथीदारासह वेगवेगळे टोळी करुन केली आहे. अशा खबरे वरुन दिनेश चव्हाण व गोलु ऊर्फ सागर गुल्हाने दोन्ही रा.दर्यापुर यांना सापळा रचुन ताब्यात घेतले व सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली नंतर पुन्हा अधिक कौशल्याने विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याचे कबुल केले वरुन गुन्हयातील एकुण 10 आरोपी व चोरीचा माल विकत घेणारे 1) गजानन खरुले रा. दर्यापुर 2) शेख बसीम शेख विस्मीलना वय 42 वर्ष रा. पाण्याच्या टाकी जवळ, अन्सार नगर, अमरावती यांचे सह एकुण 12 आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांनी ताब्यात घेतले असुन त्यांचे कडुन एक मोसा किंमत अं.50,000/-रु,06 मोबाईल कि.अं.42,000/-रु, अंदाजे 05 किलो कॉपर केबल कि.अं.5000/- असा एकूण 97,000/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कार्यवाही मुळे जिल्हयातील एकुण 07 चोरीचे गुन्हे पुढीलप्रमाणे पो.स्टे. खल्लार हधीतील ०४ गुन्हे, पो.स्टे. दर्यापूर हचीतील ०१, पो.स्टे. खोलापूर हद्योतील ०१ व पो.स्टे. कु-हा हथीतील ०१ गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी दिनेश चव्हाण व त्याचे सोबत असलेले गुन्हयातील एकुण 03 आरोपी व 02 भंगार विक्री करणारे यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. दापुर येथे देण्यात आले तसेच आरोपी गोलु चव्हाण यास व त्याचे सोबत असलेले एकुण 05 आरोपीतांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. खल्लार येथे देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा., अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, तस्लीम शेख, मुलचंद भांबुरकर, पो.हे. कॉ. सुनील महात्मे, सैय्यद अजमत, सुधीर बावणे, निलेश डांगोरे, चेतन दुबे, अमोल देशमुख, मंगेश लकडे, सचिन म्हसांगे, दिनेश कनोजीया, सर जिप चालक पो.हे. कॉ. प्रज्वल राऊत, सर्व नेमणुक स्था.गु.शा. अमरावती (ग्रामीण) तसेच पो.स्टे. सायबर अमरावती (ग्रामीण) येथील पो.हे. कॉ. सागर धापड, शिवा शिरसाठ, रितेश गोस्वामी, विकास अंजीकर यांनी केली.
१) अक्षय रघुनाथ पवार वय 30 राहणार हिवरा बू. ता.नांदगाव खंडेश्वर पोस्ट लोणी

२) दर्शन दिवाकर गवई वय 24 राहणार भीम नगर दर्यापूर

३) राजेश रामराव चव्हाण वय 32 राहणार पुनर्वसन एकविरा शाळेजवळ दर्यापूर

४) वैभव दिलीप नेवारे वय 24 वर्ष राहणार शौनीपुरा महाराणा प्रताप शाळेजवळ दर्यापूर

५) सागर उर्फ गोलू किशोरराव गुल्हाने वय 27 वर्ष राहणार मोमीनपुरा खोल्हापूरी गेट दर्यापूर

६) संतोष सहदेवराव सोळंके वय 35 वर्ष राहणार दीक्षाभूमी नगर दर्यापूर

७) दिनेश काशिनाथ चव्हाण वय 29 वर्ष राहणार दीक्षाभूमी नगर दर्यापूर

८) हरीश ज्ञानदेवराव हिंगणकर व 39 वर्ष राहणार महाराणा प्रताप शाळेजवळ दर्यापूर

९) सेषन नागोराव सोळंके वय 24 वर्ष राहणार दीक्षाभूमी नगर दर्यापूर.

माल घेणारे

१०) गजानन हरिराम खरुले वय 38 वर्ष राहणार आठवडी बाजार बनोसा दर्यापूर

11) शेख वसीम शेख बिस्मिल्ला वय 42 वर्ष राहणार पाण्याच्या टाकीजवळ अन्सार नगर अमरावती
12) विशाल छोटू चव्हाण वय 30 वर्ष रा. हिवरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट