70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या 3 आरोपीना केले जेरंबद रु.21 लाख किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत जालना स्था. गुन्हे शाखेची कार्यवाही.

सह संपादक -रणजित मस्के
जालना


दिनांक 24/06/2025 रोजी फिर्यादी नामे श्री. रवि प्रदिप खोमने, वय 36 वर्षे, व्यवसाय संस्था चालक रा. गांधीचमन जालना यांनी पोलीस स्टेशन चंदनझिरा जालना येथे दिलेल्या फिर्यादीवरुन खंडणीचा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेऊन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव व पथकास सुचना दिल्या होत्या.
त्यावरुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंन्सल यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने दिनांक 24/06/2025 रोजी गुन्हयातील आरोपी नामे 1) करण विलास निकाळजे, वय-25 वर्ष 2) निलेश रावसाहेब निकाळजे, वय-25 वर्ष, दोघे रा. तांदुळवाडी, ता.जि. जालना 3) मयुर कुंडलीक निकम वय-21 वर्ष, रा. कन्हैयानगर जालना यांचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील मुददेमाल रु.7,91,500/- रोख रक्कम, गुन्हा करतांना वापरलेली रु.10.000,00/-किमतीची टोयोटा ग्लांजा कार, रु.1200/- किंमतीचे पिस्टल सारखे दिसणारे लायटर, खंडणीच्या पैशामधुन खरेदी केलेले रु.1,07,000/- किंमतचे सोन्याचे दागीने, खंडणीच्या पैशातुन खरेदी केलेला रु.2,05,000/-किमतीचा फोटोग्राफीचा सोनी कंपनीचा कॅमेरा असा एकुण रु.21,04,700/- किंमतीचा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात आले असुन उर्वरीत आरोपीतांचा शोध घेत आहोत. सदर आरोपीतांना पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन चंदनझिरा जालना येथे हजर करण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना श्री अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदिप चिंचोले, सतिष श्रीवास, देविदास भोजने, धिरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षिरसागर, चालक सौरभ मुळे सर्व स्था.गु.शा.जालना यांनी केली आहे.