महात्मा गांधी चौक पोलीसानी प्रतिचंधीत सुगंधी तंबाखूची वाहतूक करुन विक्री करणा-यांवर छापा, ३ इसमांवर गुन्हा दाखल, ५७० किलो वजनाच्या सुगंधीत तंवाखू जप्त..

सह संपादक -रणजित मस्के
मिरज

एकूण ११,०२,६००/- रु. चा मुद्देमाल जप्त
पोलीस स्टेशन
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज, जि. सांगली
अपराध क्र आणि कलम
गु.र.नं. १४८/२०२५
भा. न्या.सं. कलम १२३, २२३, २७४, २१०५, ३(५) सह अन्नसुरक्षा मानके कायदा कलम २६(२) (१), २६(२) (IV), २७(३) (d), २७ (३) (९), ३०(२) (a), ३(१) (zz) (V), ५९
गु.घ.ता वेळ व ठिकाण
दि. २३.०६.२०२५ रोजी ०३.०० वा. मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायचे ब्रीजचे खाली, मिरज
गु.दा.ता वेळ
वि. २४.०६.२०२५ रोजी ००.०८ वा.
कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार
मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली
मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली
फिर्यादी नाच
सुमित सदानंद खांडेकर,
अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), सांगली
माहितीचा रखोत
गोपनीय बातमीदारामार्फत संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायक्याड, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती पूनम पाटील,श्री संदीप गुरव, पोलीस हेडकॉन्स्टेपल अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, सूरज पाटील, पोलीस नाईक नानासाहेच चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, अमोल तोडकर, बसवराज कुंदगोळ, जावेद शेख, मांसीन टिनमेकर
चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुनिल कांचळे
संशयित नाय व पत्ता
१) राजकुमार निगाप्पा बुदीहाळ, वय ३०, रा. यड्राय फाटा, रेणूकानगर, यद्वाय, जि. कोल्हापूर २) हारुण शौकत हृक्कीरे, वय ४४, रा. राजवाडा चौक, जामा मस्जीदजवळ, इचलकरंजी, जि. कोल्हापूर
उप्त मुद्देमाल
३) रिहानमलीक मुबारक मूल्ला, वय २४, रा. शहापूर, दत्तनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर
१) १,०२,६००/- रु. ची महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली ५७० किलो सुगंधी तंबाखू
२) १०,००,०००/- रु. एक आयशर चारचाकी वाहन
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत :-
मा. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील नशेच्या पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल निल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा व गुटखा तसेच नशेच्या साहीत्याची विक्री करणारे लोकांवर प्रभाची कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याबाचत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत नशेच्या पदार्थांचा साठा, विक्री व वितरण करणारे इसमांयायत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.वी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित
केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमलीपदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करुन उत्कृष्ठ कामगिरी केली होती.
मा. वरीष्ठांचे आदेशाप्रमाणे नशाखोरी तसेच अंमली व नशायुक्त पदार्थ तसेच गुटखा विक्री रोखण्याचे अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील नमूद पोलीस पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकातील श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांना दि. २३.०६.२०२५ रोजी रात्री उशिरा गोपनीय माहीती मिळाली की, मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रीजचे खाली, मिरज येथे एक आयशर ट्रक एमएच-१५ एफव्ही-११०८ हा संशयीरीत्या उभा असून सदरचे ट्रकमधून दोन इसम काहीतरी संशयीत मुद्देमाल गाडीतून खाली उतरचीत आहेत. अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदर चातमीवरुन संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ पंच व फोटोग्राफरसह महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील वर नमूद पथकासोचत मिळाले बातमीप्रमाणे मिरज ते निलजी बामणी रोडवरील हायवे ब्रीजचे खाली, मिरज येथे जावून तेथे सापळा रचून थांबले असता तेथे दोन संशयीत इसम सदरचे ट्रकमधून काहीतरी संशयीत मुद्देमाल गाडीतून खाली उतरवीत असताना दिसून आले. त्यांचा मिळाले बातमीप्रमाणे संशय आल्याने नमूद पोलीस पथकाने त्यांना पळून जाणेची संधी न देता शिताफीने ताब्यात घेवून त्यांना ट्रकमधील साहीत्याचाचत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पंचांसमक्ष सदर ट्रकची झाडती घेतली असता नमूद इसम यांनी, तपासणीमध्ये चकवा देवून तपासणी करणा-या पथकाला सापडू नये यासाठी शक्कल लढवून लिंबू तसेच इतर शेतीमाल याच्या दोनशे पोती साहीत्याच्या खाली महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा लपवून लिंबू तसेच शेतीमाल साहीत्याची वाहतूक करीत असल्याचा बनाव केला असल्याचे दिसून आले. नमूद पोलीस पथकाने सदर इसम नामे १) राजकुमार निगाप्पा बुदीहाळ, वय ३०, रा. यद्राच फाटा, रेणूकानगर, यड्राव, जि. कोल्हापूर व २) हारुण शौकत हुक्कीरे, वय ४४, रा. राजवाडा चौक, जामा मस्जीवजयळ, इचलकरंजी, जि. कोल्हापूर यांचेवर लागलीच कायदेशीर कारवाई करीत त्यांना ताध्यात घेवून त्यांचेकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखूचा १,०२,६००/- रु. किंमतीचा ५७० किलो एचा मोठ्या प्रमाणातील साठा व सदरची प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूची चाहतूक करण्यासाठी वापरलेला ट्रक असा एकूण ११,०२,६००/- रु. चा मुद्देमाल जप्त केला असून सदरचे आरोपींना अधिक विश्वासात घेवून त्यांचेकडे कौशल्यापुर्ण तपास केला असता, त्यांनी सदरचा सुगंधी तंबाखूचा साठा हा इतर संशयित नामे रिहानमलीक मुधारक मुल्ला, वय २४, रा. शहापूर, दत्तनगर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर याचे सांगणेवरुन कर्नाटक राज्यातून आणला असून तो मिरज च इचलकरंजी परीसरातील पानपट्टीधारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच मा. वरीष्ठांचे आदेताने कारवाई करीत गुन्हयातील इतर संशयीत नामे रिहानमलीक मुबारक मुल्ला यास इचलकरंजी येथून गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेणेत आलेले असून सदरचे प्रतिबंधीत मुगंधी तंचाखूचे कारवाईबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), सांगली यांना अवगत करुन त्यांचे फिर्यादीवरुन वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू व गुटखा यांची विक्री व वितरण व्यवस्थेचे कर्नाटक-इचलकरंजी कनेक्शन समोर आलेले असून त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कहील पोलीस पथक करीत आहे.
महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून ” नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री तसेच वितरण करणा-या अवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत जास्तीत जास्त प्रभाची कायदेशीर कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीरा खग्णेतर्फे आचाटन करण्यात येत आहे.