अधिकारी फाउंडेशन व माणसातील देव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी भक्तांना छत्री, रेनकोट फराळ वाटप..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

हडपसर

सामाजिक जबाबदारीच एक अनुकरणीय प्रदर्शन म्हणून अधिकारी फाउंडेशन आणि माणसातील देव फाउंडेशन गेल्या चार वर्षापासून वारकरी समुदायासाठी वारीत सक्रियपणे सेवा करत आहेत. या उदात्त उपक्रमाद्वारे यावर्षीही मगरपट्टा चौक हडपसर येथे वारकरी भक्तांना मोफत एक हजार छत्री, रेनकोट आणि फराळाचे वाटप करण्यात आले याव्यतिरिक्त यावर्षी वारकरी भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि औषधी वितरण ही करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ सर यांनी बोलताना अधिकारी सोशल फाउंडेशन आणि माणसातील देव फाउंडेशन यांनी गेल्या चार वर्षापासून हाती घेतलेल्या वारकरी सेवा उपक्रम व सामाजिक जबाबदारी प्रति त्यांची आढळ वचनबद्धता आणि प्रामाणिकता दर्शवते असे प्रतिपादन केले.
या सामाजिक उपक्रमात माणसातील देव फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत आशा अनिल गवळी, उपाध्यक्ष प्रथमेश तुपे,अधिकारी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उस्मान बशीर शेख, इंटेन्सव्हिट क्रिटिकल केअरचे डॉ अभिनव महेश्वरी , उद्योजक अविनाश तुपे, गोफार्मलीचे प्रकाश मंगाने, सुदामा दास, सहवास मिडियाचे अविष्कार सुरवसे, नागनाथ जाधव, चंद्रकांत राऊत, नितेश लोणकर, बबन पवार यांनी उपस्थिती दर्शवून वारकरी समुदायाला आवश्यक सेवा, आदरातिथ्य ,आरोग्य सेवा प्रदान करून यात्रेकरूंच्या कल्याणासाठी आणि अध्यात्मिक समृद्धीसाठी योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट