गांधीनगरमधील व्यापा-याचे पैसे चोरणा-या टोळीकडुन १,७८,०००००/- रुपये रोख स्था. गुन्हे शाखा कोल्हापूर यांनी केले जप्त

सह संपादक -रणजित मस्के
कोल्हापूर :-गांधीनगर येथील व्यापारदार यांचे कंपाऊडमध्ये पार्क केलेल्या टेंपोच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेले पैसे दि. 13.06.2025 रोजीचे मध्यरात्री अज्ञात चोरटयांनी पाळत ठेवुन गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊडचा पत्रा उचकटुन आत प्रवेश करुन कपांऊडचे आतील बाजुस पार्कंग केलेल्या टेंपोची काच फोडुन डॅश बोर्ड मधील रोख रक्कम चोरून नेली होती. त्याबाबत फिर्यादी कैलास वसंत गोरड मुळ रा. शहापुर बेळगाव राज्य कर्नाटक सध्या रा. गांधीनगर कोल्हापूर यांनी तक्रार दिलेने गांधीनगर पोलीस ठाणेस गु.र.नं 296/2025 भा.न्या.स. कलम 303 [2] प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता. तसेच फिर्यादी यांचे मित्रांची देखील काही रक्कम अशी एकुण 1,90,00,000/- चोरीस गेल्याची माहिती फिर्यादी यांनी दिली.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असलेने कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक मा. श्री योगेश कुमार गुप्ता साो, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी यांना सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
मा. पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व जालिंदर जाधव यांची दोन तपास पथके नियुक्त करुन नमुद गुन्ह्याचा समांतर तपास चालू केला. तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा योगेश पडळकर, रा. लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर याने व त्याचे साथीदारांनी मिळुन केला असून ते सर्वजण हॉकी स्टेडीयम कोल्हापूर येथे येणार असले बाबत खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे तपास पथकाने हॉकी स्टेडियम चौक कोल्हापूर येथे सापळा लावुन इसम नामे योगेश पडळकर व इतर इसमांना दोन मोटर सायकलसह ताब्यात घेतले त्यांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे 01) योगेश किरण पडळकर वय 30, रा लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर 02) स्वयंम सचिन सावंत वय 19 रा. बुधवार पेठ कोल्हापूर 03) सम्राट संजय शेळके वय 24 रा लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर, व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशी सांगीतली त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता इसम नामेयोगेश पडळकर याने सांगीतले की, गुडलक स्टेशनरीचे व्यापारी नामे प्रकाश वाधवाणी यांचेकडे स्वरुप शेळके हा कामास होता. त्याला कैलास गोरड याचे आर्थिक व्यवहार व रोख रक्कम कोठे ठेवतात याबाबतची इंत्यभुत माहिती असलेने तो आम्हास पैशाबाबतची सर्व माहिती देत होता. त्याचे माहितीने योगेश पडळकर, स्वरूप शेळके, स्वयंम सावंत [गोटया), विधीसंघर्षग्रस्त बालक, सम्राट शेळके अशांनी गेले एक महिन्यापासुन राजेंद्रनगर येथे विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या घरी एकत्र येवुन गुडलक स्टेशनरीच्या कपांऊडमध्ये यांचेकडे चोरी करण्याचा प्लॅन तयार केला.
ठरलेल्या प्लॅन नुसार स्वरुप शेळके याने कैलास गौरड यांचे अशोक लेलैंड कंपनीच्या टेंपोच्या डॅश बोर्ड मध्ये पैसे ठेवलेले आहेत तो टेंपो गुडलक स्टेशनरीचे बाजुला असले पत्र्याचे कंपाडमध्ये पार्कीग केलेला असुन तो टेंपो उदया बाहेर गावी जाणार आहे अशी माहिती दिली. त्यानंतर सर्वांनी मिळून दि. 14.06.2025 रोजी मध्य रात्री 1 वा. चे सुमारास दोन मोटरसायकलने रेल्वे पटरीच्या पलिकडुन गुडलक स्टेशनरीचे पत्र्याचे कंपाऊडजवळ जावुन कंपाऊंडचा पत्रा उचकटला त्यानंतर पार्कीग मध्ये गेले. स्वरुप शेळके याने दिलेलया माहितीप्रमाणे अशोक लेलैंड कंपनीचा टेंपोच्या काचा फोडुन डॅश बोर्ड जवळील कप्यात रोख रकमेचे असलेले पांढरे रंगाचे पोते चोरुन नेले अशी कबुली दिली.
आरोपींना ताब्यात घेतलेनंतर त्यांचेकडे कोणतीही रक्कम नसलेने त्यांना पुन्हा विश्वासात घेवुन त्यांचेकडे कसुन चौकशी केली असता त्यांनी चोरलेली रक्कम ही त्यांचा साथीदार गोटया उर्फ स्वयंम सावंत याचे मंगळवार पेठेतील खोली मध्ये ठेवलेली आहे असे सांगीतले त्यानंतर गोटया उर्फ स्वयंम सावंत याचे घरातुन चोरून नेलेली 1,78,00,000/- रुपये रोख रक्कम कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त करणेत आली आहे. तसेच सर्व आरोपींनी गुन्हा करणेकरीता वापरलेली दोन दुचाकी वाहने व तीन मोबाईल हँडसेट असा एकुण 1,79,05,000/- रुपयेचा मुददेमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करणेत आलेला आहे. ताब्यात घेतलेल्या सर्व इसमांना पुढील कारवाई करीता गांधीनगर पोलीस ठाणे येथे हजर केले असुन पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करवी सुरू आहे. तसेच आणखीन कोण आरोपी यामध्ये सहभागी आहेत किंवा कसे याबाबत तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार गुप्ता साो, मा अपर पोलीस अधीक्षक साो, डॉ. बी. धीरज कुमार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, जालिदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, योगेश गोसावी, राजु कांबळे, प्रदीप पाटील, संतोष बरगे, गजानन गुरव, विशाल खराडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, कृष्णांत पिंगळे, अरविंद पाटील, अमित मर्दाने, सतिश तानुगडे, सचिन बेंडखळे व महिला पोलीस अमंलदार सायली कुलकर्णी यांनी केली आहे.