महात्मा गांधी पोलीसांची सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्यावर केली धडक कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के
सांगली
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. संदीप घुगे व मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मा.प्रणिल गिल्डा यांनी पोलीस ठाणे हद्दीमधील ब्लॅक स्पॉट शोधून काढून अशा ठिकाणी बसणाऱ्या मद्यपी लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.


महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीमध्ये मार्केट यार्ड व जनावर बाजार परिसरात ब्लॅक स्पॅाटवर काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन बसत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सदर माहिती अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील दोन पथक तयार करून सदर पथकांना कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते.
सदर कारवाई अंतर्गत सदर पथकांना जनावर बाजार मार्केट यार्ड परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना काही लोक ब्लॅक स्पॉटवर मध्ये मद्य सेवन करीत असताना दिसून आले. सदर इसमांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अशा प्रकारच्या ब्लॅक स्पॉट जागा आम्ही शोधून सदर जागेवर अशाप्रकारे मध्य सेवा करणारे किंवा नशा करणाऱ्या लोकांवर तातडीने कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. तसेच नागरिकांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे अंतर्गत असा कोणताही गैरप्रकार निदर्शनास आल्यास आपण तात्काळ डायल ११२ या क्रमांकावर संपर्क करून याबाबत माहिती द्यावी. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील दोन्ही पदके तात्काळ सदर ठिकाणी जाऊन कारवाई करून अशा ठिकाणी बसणाऱ्या लोकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करणार आहेत.
तसेच लोकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण असे प्रकारे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मध्य सेवन इत्यादी करू नये व सर्वांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे. जय हिंद..