जादूटोणा करून १ लाखांचे १ कोटी करुन देण्याचे आमिष दाखवणाऱ्या आरोपी रत्न लांडगेवर जालना पोलीसांची कारवाई…

सह संपादक -रणजित मस्के
जालना




दिनांक १६/०६/२०२५ रोजी फिर्यादी नामे किशोर पंडीत शेवाळे, वय ४८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. पेरेजपुर, ता. साकी, जि. धुळे यांनी दिली कि, त्यांना आरोपी रतन आसाराम लांडगे याने एक लाख रूपयाचे एक कोटी रूपये करून देतो असे आमीष दाखवुन त्यांच्याकडुन ३ लाख रूपये व त्यांच्या पुतण्याकडुन २ लाख ५० हजार रूपये घेवुन आरोपीने त्याच्या राहत्या घरामध्ये त्यांच्यासमक्ष जादु टाणाचे प्रयोग करून दाखवले. व त्यांची एकुण ५,५०,०००/-रूपयांची फसवणुक केल्याची तक्रार दिली त्यावरून पो.स्टे. तालुका जालना गु.र.नं. ४०५/२५, कलम ३१८(४), ३१९(२), ३५२, ३५१(२) भा. न्या. सं. सह कलम ३ महाराष्ट्र नळबळी व इतर आमानुष, अनीष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयातील आरोपी नामे रतन आसाराम लांडगे, वय ४५ वर्षे, रा. भक्तेश्वर नगर, जालना याच्या राहत्या घराची व गुन्हयातील घटनास्थळाची दोन शासकीय कर्मवारी पंचासमक्ष घरझडती घेतली असता सदर ठिकाणी नमुद आरोपी, व इसम पदमनाभ जयप्रकाश राणे, वय ४१ वर्षे, व्यवसाय निर्माता, रा. द नेस्ट कॉ. ऑप. सोसायटी, मुंलूड पश्चिम, मुंबई ८०, विकास वसंत अनभवने, वय ४१ वर्षे, व्यवसाय नाही, रा. कोकणगनर, भांडूप, पश्चिम, मुंबई, ७८, नारायण गजानन जोशी, वय ५२ वर्षे, व्यवसाय- चहाची टपरी, रा. साईप्लाझा बिल्डींग, रूम नं. ११ विरार पश्चिम, मुंबई ७७ हे मिळुन आले. सदर इसम सोबत १ लाख रू घेवुन आलेले होते. त्यांना आरोपीने एक लाखाचे ३ करोड करून देतो असे आमीष दाखवलेले होते. तसेच आरोपीच्या घराची घर झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये खालील वस्तु मिळुन आलेल्या आहेत.
१. एक लोखंडी जाडीचा पिंजरा, २. एक लाकडाची विना, ३. पितळाची मोठी समयी, ४. एक काळयारंगाच्या भालुवा मास्क, ५.एक चमडयाचा मॅट ज्यावर वाघाचे चित्र आहे, ६. एक प्लास्टीकची छडी ज्यावर मानव हाडा सारखी कवटीचे आकार आहे., ७. प्लास्टीकची मानवी कवटी, दोन पाय व दोन हात, पाच बोट असलेला प्लास्टीक चा पंजा, ८. स्टीलचा हदळ, कुंकुचा पंचपाळ, ९. चार नारळ, १०. हदळ, कुंकुची एक-एक पुडी, ११. एक स्टीलचा तांब्या व स्टीलचा एक लहान ग्लास, १२. काळयारंगाची कपडयाची बाहुली, १३. एक स्टीलचा कोयता ज्याची मुठ अंखड असुन त्यावर घोडयाचे चिन्ह आहे, १४. भगव्यारंगाचा महाकाल लिहलेला कुर्ता, १५. एक चाकु ज्याची लाकडी मुठ आहे., १६. लाल रंगाचा कापड, १७, भगव्या रंगाचा ज्यावर महाकाल असे लिहलेला रुमाल, १८. १०८ तुळशीमनी असलेला माळ, १९. ८०००/- तिन पांढऱ्या गोण्यामध्ये नोटेच्या आकाराचे कापलेले कोऱ्या कागदांचे बंडल त्यातील एका गोणीमध्ये सोळा बंडलवर प्रत्येकी एक ५०० रु दराच्या नोट लावलेली होती.
सदर गुन्हयातील आरोपी यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे गुन्हयाबाबात विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्हयात दिनांक १७/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीकडुन १,४९,०००/- रू रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. अजयकुमार बंन्सल, पोलीस अधीक्षक, जालना, मा. आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक, जालना, मा. अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शनाखाली मा. संतोष सबाळे, पोलीस निरीक्षक, अतुल पाटील, सहा. पोलीस निरीक्षक, पो.ह. २५० गाडेकर, पोकों १५११ शेंडीवाले, पोकों १५६५ माळी, पोकॉ १४६२ काळे, मपोकों १२२४ जाधव सर्व नेमणुक पो.स्टे. तालुका जालना यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक, अतुल पाटील हे करीत आहेत