अंमली पदार्थ विरुद्ध परिमंडल ३ कल्याणच्या वतीने धडक कारवाई.

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

दि २० कल्याण ठाणे

कल्याण व डोंबिवली शहर दि.१०/०६/२०२५ रोजी परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर यांचेवर कारवाई करणेकरीता पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण अंतर्गत महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हददीत दि.१०रोजी चिकनघर परिसरात हॉली कॉस शाळेच्या पाठीमागील मैदानामध्ये एक रिक्षा क्रमांक एमएच/०३/डीएस/६९९२ हि संशयीत रित्या उभी असल्याचे दिसल्याने पोलीसांनी त्यांना अडवले असता त्या रिक्षा मधुन पळून जात असताना त्यांना पाठलाग करून ताब्यात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी रिक्षा मध्ये गांजा हा अंमली पदार्थ विकी करण्यासाठी आणला असल्याचे माहिती दिली.सदर रिक्षा चालक १) फैजल अस्लम शेख वय ३१ वर्षे, रा. सोनापूर, शालीमार हॉटेल जवळ, जलील प्लंबर चाळ, रूम नंबर ६, भांडूप पश्चिम व त्याचे सोबत २) अफसर सत्तार शेख वय ३६ वर्षे, रा. खर्बी गरीब नवाज मशिद जवळ, नागपुर, जावेद खानची खोली, नागपुर याचे ताब्यातुन अंदाजे ६ किलो वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ अं.कि. ३,००,०००/- रू हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस अटक करण्यात आली.व त्याचे विरूध्द महात्मा फुले चौक पोलीस ठाणे गुरजिना ६९४/२०२५ अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडल ०३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सोपान नागरे ,पोउनि मडके ,पोलीस हवालदार चित्ते ,पाटील , जाधव ,कागरे ,पोलीस नाईक सूर्यवंशी ,पोलीस शिपाई थोरात यांनी केली आहे. अशा प्रकारे परिमंडळ ३ कल्याण मध्ये अंमली पदार्थ विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट