मारहाण करुन जबरीने पैसे लुटणाया गुन्हेगाराला ८ तासातगोंदिया शहर पोलीसांनी केली अटक

सह संपादक -रणजित मस्के
गोंदिया

दिनांक 17/06/2025 रोजी फिर्यादी श्री. सुरेंद्र निलकंठ राउत, वय- 32 वर्षे, रा. आसोली ता.जि.गोंदिया हे सकाळी 06.00 वा. सुमारास नागपुर (कामठी) येथुन ट्रेनने गोंदिया येथे आले व घरी जाण्यासाठी पायी-पायी जयस्तंभ चौककडे जात असतांनी 06.15 वा. सुमारास दोन अनोळखी इसम मोटार सायकल ने येवुन फिर्यादीस मोबाईल मागितले असता मोबाईल दिले नाही म्हणुन त्यांनी फिर्यादीस लाथा बुक्यानी मारहाण करुन फिर्यादीच्या पँटच्या खिश्यातुन विवो कंपनीचा मोबाईल किंमती 10,000/- रु. व नगदी 17,000/- रु. असा एकुण 27,000/- रु चा मुद्देमाल जबरीने हिसकावून मोटार सायकलने पळुन गेल्याचे फिर्यादीचे तक्रार व वैद्यकीय परिक्षण अहवालावरुन गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे दि. 17/06/2025 रोजी अप क्रं. 442/2025 कलम 309(6), 3(5) भान्यासं -2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . घटनेनंतर दोन्ही आरोपी हे फरार झाले होते.
गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय सुत्राच्या आधारे फरार झालेल्या आरोपीतांचा शोध घेवुन 08 तासाच्या आत आरोपी राज ऊर्फ मारी सुनील जोसेफ , वय- 23 वर्षे, रा. गौतमनगर गोंदिया यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यात असता त्यांनी एका अल्पवयीन मुलासोबत मिळुन सदर गुन्हा केल्याचे कबुली दिल्याने आरोपी राज ऊर्फ मारी सुनील जोसेफ , वय- 23 वर्षे, रा. गौतमनगर गोंदिया यास दि. 17/06/2025 रोजी अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयात जबरीने हिसकावुन नेलेले नगदी 17,000/- रु. व विवो कंपनीचा मोबाईल किंमती 10,000/- रु. तसेच गुन्हा करुन पळुन जाणेकरीता वापरलेली मोटार सायकल हिरो कंपनीची पॅशन प्लस किंमती 10,000/- रु. असा एकुण 37,000/- रु. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. साहील झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, पोउपनि/अनिल डोंगरवार, डी.बी. पथकाचे पो.हवा. कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतीश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, पो. शि . दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, मुकेश रावते, राकेश बंजारे, सोनु नागपुरे व सनोज सपाटे यांनी केली आहे.