लोणावळा व स्था. गुन्हे शाखा पुणे पोलीसांनी ३५ तोळे सोने व २ किलो चांदी चोरांकडुन केली जप्त

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

लोणावळा शहर पो.स्टे गु.र.नं. २३२/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३००५ (ए), ३३१(३) (४) प्रमाणे दि.०९/०६/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील फिर्यादी नामे विना नारायण मुळे वय ६५ वर्षे रा. राजुजी कॉलनी, जुना खंडाळा रोड, लोणावळा ता. मावळ जि पुणे या एकटयाच सदर ठिकाणी राहत असून त्यांना दोन मुली आहेत. दि २५/०५/२०२५ रोजी त्यांची मुलगी अबोली हिचे कडे आंबेगाव बु॥ पुणे येथे गेल्या होत्या, त्यानंतर दि. ०९/०६/२०२५ रोजी सकाळी बिना मुळे यांचे घरी चोरी झाल्याचे त्यांचे शेजारी श्री मॉरीस यांनी विना मुळे यांना फोन करून सांगितले. त्यानंतर बिना मुळे या त्यांची मुलगी अबोली हिथे सह लोणावळा येथे आल्या. त्यांचे घरात चोरी झाली होती, कुलूप तोडणेत आलेले होते व एकूण ४७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २ किलो प्रेम वजनाची चांदीची भांडी, असा एकूण २९,२६,०००/- मुद्देमाल चोरी गेलेबाबत फिर्यादी बिना नारायण मुळे यांनी वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.
पावसाळा सुरू झालेनंतर मालमत्ता चोरीचे गुन्हयांत वाढ होत असते, त्याचप्रमाणे लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटक त्या परिसरात फिरण्यासाठी येतात, भाडेतत्वावर घेण्यात येणारे बंगले, तसेच स्थानिक रहीवासी यांचे बंद घरे या ठिकाणी घर फोडी चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटनास्थळाची पाहणी करून सदरची घटना हि रात्रीचे वेळी घडलेली असल्याचे निष्पन्न झाले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करता, गुन्हयात तीन आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर आली फुटेजची तपासणी केली असता, तीनही चोरटे हे लोणावळा स्टेशन कडे जावून रेल्वेने पिंपरी चिंचवड येथे गेले असल्याचे समजले तपासादरम्यान उपलब्ध झालेले सीसीटीव्ही फुटेज हे गोपनीय बातमीदारांना पोहचविण्यात आले होते. दि १६/०६/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चिंचवड परिसरात आरोपींचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार चंदू माने रा. चाफेकर नगर झोपडपट्टी चिंचवडगाव पुणे याने त्याचे इतर साथीदाराचे मदतीने केला असून तो त्याचे साथीदारासह वडगाव मावळ येथे गेलेला असल्याचे सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव मावळ परिसरात भर पावसात त्याचा शोध सुरू केला, पावसाचा जोर जास्त होता, त्यामुळेच आरोपी चंदू माने हा वडगाव मावळ जुना मुंबई-पुणे बायपास रोडवरील एका झाडाखाली त्याचे एका साथीदारासह उभा असताना मिळून आला. त्यांना पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले. आरोपी १) चंद्रकांत अनंत माने ऊर्फ चंदू वय ३२ वर्षे, चाफेकरनगर, झोपडपट्टी, चिंचवडगाव पुणे, २) धनंजय हरीष काळे वय २० वर्षे, रा. भारतनगर, झोपडपट्टी, चिचवडगाव पुणे, यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता, त्यांनी लोणावळा येथे घरफोडी चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपींना लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले. आरोपीना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेवून तपास करता, आरोपींनी चोरी केलेले सोन्याचे दागिने व चांदीची भांडी ही आरोपी ३) दिपक शिवाजी मंदगे, वय ३८ वर्षे रा. पाटील आळी, कर्जत, जि. रायगड ४) कैलासचंद्र धगनलाल जाट, वय ४० वर्षे रा. स्वस्तीक व्हिला, सेक्टर १९, वाशी यांचे मदतीने विक्री केले असल्याचे समजले. त्याप्रमाणे त्या दोघांना ताब्यात घेवून तपासादरम्यान ३४ तोळे ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, २ किलो ग्रॅम वजनाची चांदीची वीट असा एकूण ३० लाख ०१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेलो आहे.
यातील आरोपी चंद्रकात माने याचेवर सुमारे ५० हून अधिक घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो चोरी करताना नेहमी बेगवेगळे साथीदार सोबत ठेवतो. त्याचेवर कर्नाटक, चेन्नई, सोलापूर, पिंपरी चिंचवड, पुणे शहर हद्दीत गुन्हे दाखल आहेत. १५ ते २० दिवसांपूर्वीच चंद्रकांत माने हा चेन्नई येथील घर फोडीचे गुन्हयातून जामीनावर बाहेर आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे प्रभारी लोणावळा विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर पो स्टे चे पो नि राजेश रामाधरे, स्था. गु.शा. चे पोसई अभिजीत सावंत, लोणावळा शहर पो स्टे चे सपोनि राहूल लाड, ग्रेड पोसई रमेश भिसे, ग्रेड पोसई सुर्यकांत वाणी, स्थागुशा चे पोलोस अंमलदार, राहुल पवार, सागर नामदास, धिरज जाधव, तुषार भोईटे, अमोल शेडगे, वैभव सावंत, समाधान नाईकनवरे, समीर तांगडे, ग्रेड पोसई मुकुंद कदम लोणावळा शहर पोस्टे पोलीस अंमलदार संदिप मानकर, अविनाश जाधव, तुषार भोसले यांनी केली असून पुढील तपास लोणावळा शहर पो स्टे व स्थागुशा चे पथक करत आहेत.