पानशेत येथील स्था. इसमाचा पर्यटक युवकांनी केलेल्या खुनाचा गुन्हा २४ तासांचे आत उघडकीस..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे

पाच आरोपी केले जेरबंद - स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ची कारवाई
वेल्हा पोलीस स्टेशन गू.र.नं. ७३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१),३ (५), १८९(२), १९१(२), प्रमाणे दि. १६/०६/२०२५ रोजी दाखल असून सदर की, दि. १५/०६/२०२५ रोजी मौजे पानशेत येथे नंदाबाई कुंभार मावशीचे हॉटेल समोर अनोळखी पाच मुलांनी सिगारेट ओढत असताना, किरकोळ वादावरून रोहीदास कालूराम काटकर वय २४ वर्षे रा. कादवे ता वेल्हे जि पुणे यास माराहाण करून त्याचे छातीवर दगड मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असून ते पाचही अनोळखी मुले त्यांचेकडील काळे रंगाचे अॅक्टीका व स्प्लेंडर मोटार सायकल वर पुणे बाजुला निघुन गेली होती. त्या अनुषंगाने मयत व्यक्तीचा भाऊ अविदास काळुराम काटकर वय २३ वर्ष रा. कादवे ता वेल्हे जि पुणे यांनी ०५ अनोळखी इसमांविरोधात खुनाची फिर्याद नोंदविली आहे
सदरचा प्रकार गंभीर असल्याने मा पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, साहे. पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट दिली. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साो. यांनी स्वतः स्थागुशाचे पथकाचे मदतीने घटनास्थळावरील माहितीचे अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व संशयित काळे रंगाची अॅक्टीका व स्प्लेंडर मोटार सायकल निष्पन्न करणेत आली
स्था.गु.शा. व बेल्हा पोस्टेचे पथकाने सीसीटीव्ही फुटेजचा मागोवा घेत संशयीत दोन्ही मोटार सायकल या नन्हे आआंबेगाव बाजूकडे गेल्या असल्याचे आढळून आले तसेच फुटेज मध्ये काळे रंगाचे अॅक्टीव्हा चे नंबरप्लेटवरील ९६४२ असे अंक दिसून आले त्या आधारे नन्हें परिसरात संशयीत काळे रंगाची अॅक्टीव्हाचा शोध घेत असताना, बाल्हेकर चौकातील कपडयाचे दुकानासमारे संशयीत अॅक्टोव्हा मिळून आली तिचे नंबर प्लेटवर एम.एच. १२ के.एच.१६४२ असा नंबर होता. गाडीचे मालक गणेश नवघरे यांना संपर्क करून गुनायाबाबत चौकशी केली असता, सदरची अॅक्टीव्हा मोटार सायकल ही त्यांचा मित्र आकाश सुभाष भिसे रा. चारभुजा रेसीडन्सी बाल्हेकर चौक, नन्हे पुणे हा घेवून गेला असल्याचे समजले. त्या माहितीचे आधारे १) आकाश सुभाष भिसे वय २१ वर्ष रा. चारभुजा रेसिडेन्सी, रुम नं ५०८, ५ वा मजला वाल्हेकर चौक, नन्हे, ता. हवेली जि. पुणे मुळ मु.झरी पो. मानोद ता. पाथरी जि. परभणी यास ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले, गुन्हा करते वेळी त्याचे सोबत असणारे त्याचे साथीदार आरोपी २) भागवत मुंजाजी आसुरी वय २० वर्ष रा. कानडे हाईट्स, दुसरा मजला, रुम नं.२०१, सिध्दी चोक, नन्हे ता.हवेली जि.पुणे, मुळ पेडगाव ता. परभणी जि. परभणी ३) रितेश उत्तम जोगदंड वय २१ वर्ष रा. अभिनव कॉलेज रोड, १ शानेश्वर पार्क, बिल्डिंग, फलॅट नं. ४०३, चौथा मजला, नन्हे ता. हवेली जि.पुणे मुळ पेडगाव ता. परभणी जि. परभणी ४) उमेश ऊर्फ भैय्या रामभाउ शेळके, वय २१ वर्ष हवेली जि.पुणे, मुळ पेडगाव ता. परभणी जि.परभणी ५) पांडुरंग भानुदास सोनवणे वय १९ वर्ष रा. चारभुजा रेसिडेन्सी, ग्रांउड फलोअर, सिक्युरिटी रुम, मुळ रा. हटटा, पो. कुपटा, ता. सेलू जि.परभणी यांना देखील ताब्यात घेण्यात आले.
त्या सर्व आरोपीकडे तपास केला असता, सर्व पाच आरोपी हे काळे रंगाची अॅक्टीव्हा नं. एम. एच. १२ के. एच. १६४२ व स्प्लेंडर मो.सा. एम.एच. २२ बी.डी. ६२०९ अशी घेवून दि. १५/०६/२०२५ रोजी घेवून पानशेत धरणाकडे फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी १९/०० वा सु॥ स माधारी येत असताना, आरोपी हे पानशेत येथील नंदाबाई कुंभार यांचे हॉटेल समोर थांबून सिगारेट पिल असताना, यातील मयत इसम रोहीदास काळुराम काटकर वय २४ वर्षे रा. कादवे ता वेल्हे जि पुणे याने आरोपीना हटकल्याचे कारणावरून त्यांचेत भांडण होवून मारामारी झाली, त्या भांडणामध्ये रोहीदास काटकर हा खाली पडलेनंतर त्याचे छातीवर दगड मारल्याने ती मयत झाला. त्यानंतर सर्व आरोपी हे त्यांचेकडील दोन्ही मोटार सायकलवर बसून निघून गेले.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीपसिह गिल्ल, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बेल्हा पोलीस प्रभारी अधिकारी सपोनि नितीन खामगळ, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश भगत, विनोद भोकरे, हनुमंत पासलकर, अतुल डेरे, अमोल शेडगे, रामदास बाबर, राहुल घुबे, प्रसन्न घाडगे, वेल्हा पोलीस स्टेशनकडील पोसई अमित देशमुख, अंमलदार ज्ञानदीप धोवार, पंकज मोघे, आकाश पाटील, राजेंद्र आवदे, अजय गाडी, सोमनाथ जाधव, युवराज सोमवंशी केली असून पुढील तपास वेल्हा पो स्टे चे पोसई अमित देशमुख हे करत आहेत.