बसस्थानक परिसरातील अनोळखी इसमाच्या खुन प्रकरणातील मयताची ओळख पटवुन आरोपी केला जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना ;

दिनांक 10/06/2025 रोजी या मयत अनोळखी पुरुषास अज्ञात आरोपीताने गळा आवळुन तसेच त्याचे डोक्याचे पाठीमागील बाजुस काहीतरी वस्तुने मारुन त्यास जखमी करुन जिवानिशी ठार केले म्हणून सरकारतर्फे फिर्यादी नामे संतोष गंगाराम जाधव, वय-42 वर्ष, व्यवसाय-नौकरी पोहेकॉ/319 पोलीस ठाणे सदर बाजार, जालना यांचे फिर्यादीवरुन दिनांक 10/06/2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाणे जालना येथे गु.र.क्र.496/2025 कलम 103(1) भा.न्यां.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर अनोळखी मयत इसमाची ओळख पटवुन अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत मा. पोलीस अधिक्षक, जालना श्री. अजयकुमार बंसल यांनी श्री पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांना सुचना दिल्या होत्या,

त्याअनुषंगाने श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेकामी पथक तयार केल्याने मारेकऱ्याचा शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीची ओळख पटवली असता त्याचे नाव आबासाहेब विठ्ठलराव घोडके, वय-58 वर्ष, व्यवसाय-मजुरी, रा. भवानीनगर, जालना असे असल्याने त्यास त्याचे राहते घरातुन ताब्यात घेवुन त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली की, आरोपीताने मयताकडील मोबाईल व पैसे चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा मयताने प्रतिकार केल्याने आरोपीने त्याचा गळा आवळुन त्याचा खुन केला आहे.

मयताची तांत्रिक साधनाच्या मदतीने ओळख पटविली असता मयताचे नाव रामेश्वर दत्ताराव पवार, वय-28 वर्ष, रा.गट नं.02, तरोडा ब्रद्रुक, हनुमान मंदीराच्यापाठीमागे, लक्ष्मीनारायणनगर, नांदेड असे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल व मा. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गुणाजी शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक श्री. योगेश उबाळे, पोउपनि श्री. राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, संभाजी तनपुरे, प्रभाकर वाघ, गोपाल गोशिक, कैलास खाडे, जगदीश बावणे, दिपक घुगे, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, किशोर पुंगळे, योगेश सहाणे, सोपान क्षिरसागर, चापोशि. सौरभ मुळे, अशोक जाधवर स्था.गु.शा. जालना व पोअं. संदीप मांटे, सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट