सासवड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणारे सोपानकाका मंदिर येथे आषाढी वारी २०२५ अनुषंगाने सासवड पोलीस स्टेशन स्टाफ, बॉम्ब शोधक व नाशक पथक, जलद प्रतिसाद पथक (QRT) दहशतवादी विरोधी पथक (ATB) यांनी संयुक्तपणे मॉक ड्रिलचे प्रत्यक्षिक सादर

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सासवड :

सासवड येथे असणारे सोपानकाका मंदिरात दोन संशयित इसम लपुन बसले आहेत असा गोपनीय संदेश प्राप्त झाला. संदेश मिळताच सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी आपली टिम सक्रिय केली व सदर माहिती नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण येथे कळवुन अवघ्या काही मिनीटांत सासवड पोलीस पथक मंदिरापरीसरात दाखल झाले. सर्व भाविकांना शांतपणे बाहेर काढण्यात येऊन सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले.

नियंत्रण कक्ष येथून घटेनची माहिती मिळताच QRT टिम, बॉम्ब शोधक व नाशक टिम, तसेच दहशतवादी विरोधी पथक, व ड्रोन पथक मंदिर परीसरात पाचरण करण्यात आले. संपूर्ण परीसर सिल करण्यात आला. क्य.आर.टी पथकाने मंदिर परीसराचा ताबा घेऊन सर्च ऑपरेशन करण्यास सुरुवात केली व मंदिरात दोन अतिरेकी असल्याची निश्चिती झाली. अतिरेक्यांनी मंदिराबाहेर भिंतीलगत स्फोटक भरलेली एक बेंग ठेवली असल्याची माहिती समोर येताच बी.डी.डी.एस पथकाने सींग करण्यास सुरूवात केली. क्यु.आर.टी. पथकाचे ऑपरेशनव्दारे दोन्ही अतिरेक्यांना पकडण्यात यश मिळविले.

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संशयित बॅगची उपकरणांच्या सहाय्याने तपासणी करून तसेच सदर बॅग उपकरणांचे सहाय्याने सुरक्षितपणे हाताळून वॉटर डिस्टटरच्याव्दारे बॅग निष्क्रिय केली व आग्निशामक दलाकडून स्फोटक बॅग निष्क्रिय करण्यात आलेली जागा पाण्याचे सहाय्याने विझण्यात आली.

सदर मॉक ड्रिलचे प्रत्यक्षिक पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक मा. संदीप सिंह गिल्ल यांचे मार्गदर्शनाखाली सासवडचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. दिलीप शिंदे, सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे सपोनि संतोष साळुंके, क्यु.आर.टी. पथकाचे सपोनि कारंडे, दहशतवादी विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार तसेच बॉम्ब पथक अंमलदार सहा. फौजदार राजु जढर, पो. हवा सतिश गेंगजे, पो.हवा गणेश फापाळे, चंद्रशेखर मगर, ड्रोन पथकाचे संदिप जगताप क्यु.आर.टी. पथकाचे पो.हवा राणा, पोशि धायगुडे, अक्षय जावळे, गाडे, भोर, पाकिरे, मुंडे, दहिफळे, शेख, मुळे, बटुळे ओ.टी.बी पथकाचे विशाल गव्हाणे, विशाल भोरडे, रविंद्र जाधव, ओंकार शिंदे यांनी उकृष्ट कामगीरी केली.

सदर मॉक ड्रिल मध्ये वरीष्ठ अधिकारी यांची निर्णयक्षमता व अंमलदार यांची कार्यक्षमता तसेच प्रत्येक क्षणाला सगज राहुन कोणतीही परीस्थिती हातबाहेर जावू न देता सर्व परीस्थिती नियंत्रणात आणून सर्व अधिकारी व अंमलदार यांनी जलद प्रतिसाद वेळ, समन्वय, कार्यप्रणाली यावर भर दिला. यावरुन आगामी आषाढी वारी दरम्यान भाविकांचे सुरक्षिततेबाबत प्रशासन किती सज्ज आहे हे स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट