केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान सोहळाश्रीमती रश्मि शुक्ला मा. पोलीस महासंचालक यांचे हस्ते संपन्न

0
WhatsApp Image 2025-06-13 at 9.59.16 PM
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

मुंबई

गुन्हे तपासामध्ये उत्कृष्ट प्राविण्य दाखविणा-या पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार यांचे केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक देण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील सन २०१८ ते २०२२ पर्यंत एकूण ५४ पोलीस अधिकारी यांना सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे. राज्य स्तरावरून केंद्र शासनास पात्र पोलीस अधिकारी यांच्या शिफारसी पाठविताना मा. पोलीस महासंचालक यांचे मार्गदर्शनाखाली मा. अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापणा), महाराष्ट्र राज्य, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (गुन्हे पश्चिम पुर्व), मा. विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.), गु.अ.वि. पुणे यांची समिती गठीत करण्यात आली आहे. निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यामधून प्राप्त झालेल्या शिफारशी अहवालांची निकषांनुसार पडताळणी होवून एकूण २२ पोलीस अधिकारी यांचे शिफारशी अहवाल केंद्रीय गृहमंत्रालय येथे पाठविण्यात येतात. त्यापैकी राज्यातून दरवर्षी ११ पोलीस अधिकारी यांची निवड केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदकासाठी करण्यात येते.

सन २०२२ पर्यंत महाराष्ट्र राज्यातील पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री यांचे सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान समारंभ आज दि. १३/०६/२०२५ रोजी पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे श्रीमती रश्मि शुक्ला, मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे हस्ते पार पडला. कार्यक्रमामध्ये एकूण ११ पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांना मा. केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांचे पदक व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण व लहान मुलींचे लैंगिक शोषण, अंमली पदार्थ विरोधी गुन्हे, फसवणूक व मानवी आरोग्यास धोका करणारे गुन्हे, पोक्सो अंतर्गत गुन्हे यासारखे गंभीर गुन्हे अत्यंत कौशल्याने आधुनिक तपास पद्धीचा अवलंब करून उघडकीस आणलेले आहेत.. मा. पोलीस महासंचालक यांनी पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

समारंभास श्री. सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे, श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. राजेंद्र डहाळे, विशेष पोलीस महानिरीक्षक (रा.गु.अ.कें.), डॉ. बसवराज तेली, पोलीस उप महानिरीक्षक (आगुशा), श्री. सौरभ आग्रवाल, पोलीस अधीक्षक, पुणे पथक, श्रीमती पल्लवी बर्गे, पोलीस अधीक्षक (का. व सं.), श्री. पी. आर. पाटील, पोलीस अधीक्षक (आगुशा), श्रीमती वैशाली माने, पोलीस अधीक्षक (तांत्रिक सेवा) याशिवाय इतर पोलीस अधिकारी, निमंत्रक असे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट