महाड भोराव बौद्धवाडी येथे एका 40 वर्षीय बाईक स्वारचा डंपर खाली चिरडून मृत्यू…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

महाड: दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी रात्री 08 :00 वाजताच्या सुमारास भोराव बौद्ध वाडी येथील दापोली पंढरपूर रोडवर मयत मदन मारुती पवार वय 40 वर्षे रहाणार धारवली, आंग्रेकोंड ,पाटील वाडी,ता.पोलादपूर, जि.रायगड हा आपल्या मोटार सायकलने मोजे भोराव बौद्ध वाडी हद्दीत पंढरपूर दापोली रोडवर उभा असणारा टाटा डंपर क्र. एम डब्ल्यू टी 6379 याने कोणताही इंडीकेटर व पार्किंग लाईट न लावल्याने व धोकादायक स्थितीत डंपर उभा केल्याने यातील मोटार सायकल स्वार याची पाठीमागुन ठोकर लागुन सदर अपघातामध्ये मोटार सायकल स्वार मदन मारुती पवार याचे डोक्यात गंभीर दुखापत होऊन जागीच मरण पावला म्हणून याची माहीती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. खोपडे यानी घटनास्थळास भेट देवुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड यानी भारतीय दंड विधान कलम 304 (अ),279,337,338,283 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री. मोरे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट