बस प्रवासादरम्यान प्रवाशांची चोरी करणाऱ्या महिला आरोपीस चंदननगर पोलीसांनी केली अटक…
पुणे
सह संपादक -रणजित मस्के
दिनांक-२७/०१/२०२५ रोजी फिर्यादी रा. चंदननगर, खराडी पुणे या दिनांक २५/०५/२०२५ रोजी दुपारी ०२.१५ वा त्यांचे बहीणीचे चिखली रोड सेक्टर १८ येथून राहते घरी येत असताना प्रवासा दरम्यान त्यांचे पर्समध्ये ठेवलेले ७,५८,५२९/- रु किमतीचे ६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून घेवुन गेले म्हणून यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन चंदननगर पोलीस ठाणे या ठिकाणी गु.र.नं.२०५/२०२५ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचा तपास चंदननगर पो. स्टे कडील तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक असवले व तपास पथकातील पोलीस अंमलदार गोणे, शिंदे, पांडे, असे चैन स्नॅचिग, वाहन चोरी प्रतिबंधक करणेकामी खाजगी बाहनांवरून पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार शिंदे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचेकरची बातमी मिळाली की, बसमध्ये चोरी करणारे संशयित महिला चंदननगर बायपास येथील बसस्टँडवर उभ्या असल्याची माहिती मिळाली, सदर बातमीची खात्री करुन कारवाई करणेकामी मा. वरिष्ठाचे मुफजल आदेशान्वये लागलीच आम्ही दोन महिला पोलीस अंमलदार सावंत व महिला पोलीस अंमलदार हंबीर असे वरील प्रमाणे बातमीचे ठिकाणी जावून बातमीप्रमाणे पाहणी केली असता, त्यांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाय पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव पत्ता १) कुसुम सुरेश जाधव, वय ६५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढया पुणे २) शांता राजुजाधव, वय ६०, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा पुणे, असे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे चंदननगर पोलीस स्टेशन येथील दाखल असलेल्या गुन्हयामधील चोरी झालेल्या सोन्या बाबत विचारपुस करता, ते उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने त्यांना चंदननगर पोलीस स्टेशन पुणे येथे आणुन विश्वसात घेवुनत पास केला असता. महिला नामे कुसुम सुरेश जाधव, वय ६५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा पुणे हिने सांगितले की, तीन ते चार दिवसापूर्वी मी व शांता राजु जाधव, वय ६०, रा. सर्वोदयकॉलनी, मुंढया पुणे यांनी केल्याचे कबुल केल्याने त्यांना दिनांक २९/०५/२०२५ रोजी १६. ४५ वा अटक करुन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
तसेच अटक महिला आरोपीतांकडून गुन्ह्यात चोरी गेलेला एकुण ७,५८,५२९/- रु किंमतीचे ६४ रॉम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत केले आहे. हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल हा फिर्यादी यांना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या हस्ते आज दि. ०९/०६/२०२५ रोजी सुपुर्द करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ चे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग- प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, तपास पथक प्रभारी अधिकारी पोउनि अजय असवले, पोलीस अंमलदार शेखर शिंदे, महिला पोलीस अंमलदार मनिषा जगताप, तृप्ती जायभाय, प्रियंका पवार, पुनम हंबीर व सावंत यांनी केली आहे.