केळवा पोलीस ठाणे येथे दाखल अल्पवयीन मुलीवर गोळीबार प्रकरणी गुन्ह्यातील आरोपीस अटक. लॉज मालकावर गुन्हा दाखल.

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

केळवा सागरी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. ३१/२०२५ भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम-१०९, १३७ (२), सह आर्म अॅक्ट कलम ३,२५ प्रमाणे मधील फिर्यादी यांनी दिनांक ३०/०५/२०२५ रोजी फिर्यादी यांनी केळवा सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की त्यांची मुलगी हिरा आरोपीत याने तिचे अज्ञान पणाचा गैरफायदा घेवून तिस फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून अपहरण करून तिला केळवे गावातील राऊत रेसीडेंसी येथे नेवून आरोपीत याने त्याचेकडील विनापरवाना पिस्तुलामधून फिर्यादीचे मुलीवर गोळी मारून अज्ञात कारणाने जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयात श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. अभिजीत धाराशिवकर, उपविभागिय पोलीस अधिकारी, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती विजया गोस्वामी, व पोलीस स्टाफ यांनी दिनेश दिपक धोडी, वय १८ वर्षे, ६ महिने जात-हिंदु वारली रा. बोईसर लोखंडी पाडा, ता. जि. पालघर यास सदर गुन्हयात दिनांक ३१/०५/२०२५ रोजी ०२.४९ वाजता अटक करुन त्यास मा. न्यायालयाने दिनांक ३१/०५/२०२५ते आज दिनांक ०७/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी दिली होती. पोलीस कोतडीमध्ये आरोपीने गुन्हयात वापरलेले पिस्टल व काडतुस जप्त करण्यात आलेले आहे. सदर आरोपीची मा. न्यायालयाने आज रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे.

सदर गुन्हयामध्ये अटक आरोपी यास पिस्टल मिळवुन देण्यामध्ये मदत करणारा फरार आरोपी याचा शोध चालु आहे. व लॉज मालक श्री. अविनाश आत्माराम राऊत यांचेवर केळवा सागरी पोलीस ताणे गुन्हा रजि.नं.३४/२०२५ बी.एन.एस. २०२३ चे कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट