अंबड पोलीसांकडुन वाळु तस्करावर MPDA Act 1981 कलम 3(1) अन्वये स्थानबध्दतेची कारवाई..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

मालाविरुध्द व शरिराविरुध्दच्या गुन्ह्यातील आरोपी वाळु तस्कर इसम नामे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली नामदेव धांडे रा. दैठणा ब्रु. ता. घनसावंगी जि. जालना याचेवर अंबड पोलीस स्टेशन हद्दीत दुधना नदी पात्रात केणीच्या साहयाने अवैध वाळुचे उत्खनन करुन त्यांची चोरटी वाहतुक करणे, वाळु चोरीवर कारवाई करणे करीता आलेल्या लोकसेवकांना त्यांचे शासकीय कर्तव्य पार पाडत असतांना लोकसेवकावर हल्ला करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे दाखल होते त्याचेवर सदर बाबत स्थानिक गुन्हे शाखा, जालना येथे प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्याचे वर्तनात काही एक फरक पडत नव्हता.

करीता पोलीस ठाणे अंबड यांनी मा.श्री.. अजय कुमार बंसल पोलीस अधिक्षक जालना, मा.श्री आयुष नोपाणी अपर पोलीस अधिक्षक जालना, मा. श्री विशाल कृष्णा खांबे उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड, मा. श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाणे कडुन इसम नामे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली नामदेव धांडे रा. दैठणा ब्रु. ता. घनसावंगी जि. जालना याचेवर महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम 1981 अन्वये स्थानबध्दता करण्याबाबत मा. पोलीस अधिक्षक साहेब जालना यांचे मार्फतीने प्रस्ताव पाठवला होता. त्यास मा. जिल्हादंडाधिकारी साहेब, जालना यांनी सदर प्रस्तावला मंजुरी देवुन दिनांक 19/05/2025 रोजी इसम नामे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली नामदेव धांडे रा. दैठणा ब्रु. ता. घनसावंगी जि. जालना याचे स्थानबध्दतेचा आदेश दिल्यापासुन अंबड पो.स्टे. चे अधिकारी/अंमलदार त्याचे मागावर होते परंतु सदरचा इसम हा सराईत अपराधी असल्याने पोलीस त्याचे शोधात गेल्यानंतर पोलीसांची नजर चुकवुन पसार होत होता, परंतु आज दि.04/06/2025 रोजी परत एकदा अंबड पो.स्टे. च्या अधिकारी यांनी सदरच्या स्थानबद्ध केलेल्या इसमांस ताब्यात घेण्याकरिता गोपनीय खब-यांना सक्रीय करुन तांत्रिक बार्बीच्या आधारे सापळा लावुन त्यांस मौजे दैठणा शिवारातुन ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे सपोनि अमोल गुरले, पोउपनि भगवान नरोडे, पो.ह. 1272 दिपक पाटील, पो.शि 344 अरुण मुंडे, पो.शि. 47 स्वप्निल भिसे, पो.शि 221 संजय क्षिरसागर यांनी केली असुन, स्थानबद्ध इसम नामे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली नामदेव धांडे रा. दैठणा ब्रु. ता. घनसावंगी जि. जालना यांस मा. जिल्हाधिकारी सो. जालना यांनी दिलेल्या आदेशानुसार 01 वर्षा करीता स्थानबध्द करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी दाखल करणेकामी पुढील कार्यवाही करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट