पोस्को महाराष्ट्र स्टीलचा समाजाभिमुख उपक्रम – ‘ग्लोबल वॉलंटिअर वीक’ उत्साहात साजरा…

प्रतिनिधी:-सचिन पवार
माणगांव रायगड
माणगांव


माणगांव :-पोस्को कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाही २२ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत ‘ग्लोबल व्हॉलंटिअर वीक’ साजरा करण्यात आला. या विशेष सप्ताहामध्ये पोस्कोच्या जगभरातील युनिट्समधील कर्मचारी सामाजिक योगदान देण्यासाठी पुढे आले. या उपक्रमाचा उद्देश केवळ वस्तूदान किंवा मदत करणे नसून, कंपन्यांनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून गरजूंच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा, हा आहे. पोस्को महाराष्ट्र स्टीलनेही यावर्षी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत विविध सामाजिक उपक्रम राबवले.या सप्ताहात पोस्को महाराष्ट्र स्टीलने एकूण सात सामाजिक उपक्रम राबवले. वृक्षारोपण उपक्रमांतर्गत २५ शेतकऱ्यांना १९ प्रकारच्या एकूण २५० औषधी, मसाले आणि उपयोगी रोपांचे वाटप करण्यात आले. या रोपांमुळे शेतकऱ्यांना घरच्या घरी उपयोगी झाडे लावण्याची संधी मिळाली. माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमातील विध्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि एका महिन्याचे अन्नधान्य किराणा देण्यात आले व परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमात पोस्कोचे वरिष्ठ अधिकारी आणि स्वयंसेवकांनी ३० ज्येष्ठ नागरिकांना एका महिन्याचे किराणा साहित्य स्वरुपात मदत केली आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून मानसिक आधार दिला.
पुण्यातील DIFPT (ज्ञानदा गुरुकुल) संस्थेत विद्यार्थ्यांसोबत संवाद, AI विषयावर माहिती सत्र आणि स्टेशनरी, अन्नधान्य वाटप आयोजित करण्यात आले.
सुराज्य प्रकल्पात मुलांसोबत गाणी, गोष्टी आणि बिस्किट वाटपासह शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रीन सनराईज हिल्स परिसरात ३५ स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता केली, झाडांची निगा राखली आणि भविष्यात १०० झाडे लावण्याचा संकल्पही केला. ‘सेवादीप’ संस्थेसोबत कपडे, स्टेशनरी, खेळणी आणि इतर साहित्य जमा करून गरजुपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांमध्ये १०० हून अधिक पोस्को कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी सक्रियपणे सहभागी झाले.पोस्को महाराष्ट्र स्टीलच्या या उपक्रमांमुळे सामाजिक भान आणि माणुसकीची जाणीव अधिक बळकट झाली. यात केवळ वस्तूंचे नव्हे, तर वेळ, संवाद आणि आपुलकी यांचेही योगदान देण्यात आले. समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचलेली ही मदत सामाजिक समावेशकतेचा आदर्श ठरली आहे. ‘ग्लोबल व्हॉलंटिअर वीक’ ही संकल्पना पोस्को समूहासाठी CSR च्या चौकटीपलीकडची एक मोलाची प्रेरणा ठरत आहे.