बकरी ईद सण उत्साह निमित्ताने टिळक नगर पोलीस ठाणे तर्फे रूट मार्च..

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २ डोंबिवली ठाणे
डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाणे वतीने कायदा व सुव्यवस्था सोबत आगामी बकरी ईद सण उत्साह अनुषंगाने रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते सदर रूट मार्च पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभागाचे सुहास हेमाडे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम त्याचबरोबर डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्याचे संजय पवार, रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावेदवाड, यांच्या नेतृत्वाखाली हे रूट मार्च


विकास नाका कल्याणपुर येथे सुरू करून पुढे नवी गोविंदवाडी बिल्डिंग तुम्ही मदरसा जय भारत नगर गवळी देव मंदिर श्रीकृष्ण नगर झुबेदा मदसा दुर्गामाता मंदिर गावदेवी चौक सावित्रीबाई फुले चौक मोहन सृष्टी मार्ग कचोरे कल्याण पूर्व या ठिकाणी समाप्त करण्यात आले या रूट मार्चमध्ये तीनही पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ११सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अधिकारी आणि ४४ अंमलदार सोबत पीटर मोबाईल आणि सियाराम मोबाईल सहभागी होते‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट