आगामी बकरी ईदच्या अनुषंगाने पुणे परिमंडळ -५ तर्फे सर्व मस्जिद मौलाना यांशी विशेष बैठक..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे



दि. 30/05/25 रोजी सायं 16.30 वा. ते 17.30 वा दरम्यान परिमंडळ- 5 कार्यालयात आगामी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने परिमंडळ -5 मधील सर्व मस्जिदचे मौलाना, ट्रस्टी, कुरेशी, मनपाचे अधिकारी, पुणे कॅनटोनमेंटचे अधिकारी, कत्तलखान्याचे मुकादम यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीमध्ये उपस्थित मौलाना व ट्रस्टी यांच्याशी सण उत्सवाच्या काळात येणाऱ्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्याशी मस्जिदवरील भोंगे, कुर्बानी, प्राण्यांची अवैद्य वाहतूक, बकरा बाजार, अवैद्य कत्तलखाने, वाहतूक समस्या इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा केली.
सदर वेळी उपस्थित मौलाना , ट्रस्टी यांना शासनाने व वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचना सांगुन मार्गदर्शन केले.
सदर बैठकीला परिमंडळ -5 मधील हडपसर व वानवडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व 09 पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे मनपाकडील अधिकारी, व हद्दीतील मौलाना , ट्रस्टी ,कुरेशी असे 70 ते 80 जनसमुदाय उपस्थित होता.