मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपी पोलीसांचे रंगेहात.डोंबिवली लोहमार्ग पोलीसांचे उत्तम कामगिरी

0
Spread the love

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय

दि ३० डोंबिवली ठाणे


डोंबिवली रेल्वे स्थानक लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये दि ३०रोजी संध्याकाळ सुमारे डाऊन कल्याण स्लो लोकलच्या मधल्या जनरल डब्याचे दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना यातील आरोपीने त्यांच्या हातावर फटका मारल्याने मोबाईल फोन खाली काढून ते मोबाईल फोन उचलून चोरून नेत असताना सदर पटरीमध्ये गस्त करत असलेल्या पोलीस पथकाने सदर आरोपीला रंगेहात पकडले. त्यावेळी तक्रारदार ( फिर्यादी) तिथे हजर असून सदर इसमाने त्यांच्या हातावर कशा पद्धतीने फटका मारून त्यांच्या हातात मोबाईल फोन पाडून चोरून नेला असल्याबाबत हकीकत सांगितले. लोहमार्ग पोलिसांनी पकडलेला इसमास डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याची दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ फिर्यादी यांचा चोरी केलेला मोबाईल फोन मिळून आले. अशाप्रकारे फिर्यादी यांच्या हातावर फटका मारून मोबाईल फोन चोरी केलेल्या आरोपीस रंगेहात पकडून त्याच्याकडून नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेले माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे दिली.सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राकेश कलासागर साहेब ,लोहमार्ग मुंबई, पोलीस उपायुक्त मनोज पाटील ,मध्य परिमंडळ, सहा पोलीस आयुक्त अरुण पोखरकर कल्याण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सपोनि, जारवाल, पोलीस उपनिरीक्षक सोनार, भिलारे, तायडे, नष्टे, एम. पवार, सपोफौ चौधरी पोहवा/3327 पाटील, पोहवा/ 1436 मगर, पोहवा/ 1260 शिखरे, पोहवा/ 2739 शेळके, पोशि/ 940 पाटील, पोशि/ 1186 भांडारकर, पोशि/ 212 आखाडे, मसुब/ विवेक पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट