चोरी, घरफोडी करणारे सराईत आरोपी व चोरीचा माल घेणारा इसम जेरबंद

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

जालना

आरोपींच्या रु. 64,500/- किंमतीचा मुददेमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालना जिल्हयात चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करण्याचे मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पंकज जाधव यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना चोरी व घरफोडी करणाऱ्या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना देवुन मार्गदर्शन केले होते.

त्यानुषंगाने दिनांक 29/05/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाली की, सराईत आरोपी नामे आकाशसिंग नरसिंग बावरी, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना याने व त्याच्या साथीदाराने मिळुन राणीउचेगांव, जालना येथील मोटार मॅकेनिकचे दुकान फोडुन त्यातील मुददेमाल चोरी केला आहे. त्यानुषंगाने आरोपी नामे आकाशसिंग नरसिंग बावरी, वय-35 वर्ष रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना व त्याचे साथीदार नामे मुकिंदरसिंग निक्कासिंग टाक, वय-40 वर्ष, रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना, राजसिंग कालुसिंग टाक, वय-20 वर्ष, रा. जमुनानगर, जालना याचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देवुन आरोपीतांनी एम.आय.डी.सी. फेज क्र.03, गांधीनगर, गुंडेवाडी, पानशेंद्रा येथुनही लोखंडी जॅक, व्हिटेज जंक, कटर मशीन, जॅक लिव्हर, विदयुत मोटार, लोखंडी सळया, मोटार पंप असे आरोपीतांनी चोरी करुन घेवुन गेले असुन सदर चोरी केलेला मुददेमाल त्यांनी इसम नामे राजेक मुबारक शेख, वय-24 वर्ष, रा. संजयनगर, जुना जालना यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने आरोपी नामे राजेक शेक यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातुन रु.64,500/- किंमतीचे लोखंडी जॅक, व्हिटेज जॅक, कटर मशीन, जॅक लिव्हर, विदयुत मोटार असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीतांनी केलेल्या गुन्हयाच्या अभिलेख पडताळला असता अंबड पोलीस ठाणे गु.र.क्र. 160/25 कलम 303(4) भा.न्या.सं., तालुका पोलीस ठाणे गु.र.क्र.277/2025 कलम 303(4) भा.न्या.सं., सदर बाजार पोलीस ठाणे गु.र.क्र. 145/2025 कलम 303(2), भा.न्या.सं. चंदनझिरा पोलीस ठाणे गु.र.क्र. 12/2025 कलम 303(2) भा.न्या.सं., गु.र.क्र.29/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. या ठाण्यांतील एकुण 05 गुन्हे उघड झाले आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा. पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, विजय डिक्कर, इरशाद पटेल, संदीप चिचोले, रमेश काळे, योगेश सहाणे, सौरभ मुळे सर्व स्थागुशा यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट