किडनी प्रत्यारोपन रॅकेट गुन्हयामध्ये डॉ. अजय तावरे याची दि.०२/०६/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर

0
Spread the love

सह संपादक रणजित मस्के

पुणे

रुबी हॉल क्लिनीक, पुणे येथील लक्ष अवैध किडनी रॅकेटबाबत तत्कालीन आरोग्य सेवा मंडळ, पुणे उपसंचालक, डॉ. संजोग सिताराम कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक ११/०५/२०२२ रोजी कोरेगाव पार्क पोस्टे गु.र.क्र. ४६/२०२२ भा.द.वि. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ व मानवी अवयव प्रत्यारोपन का. १९९४ चे कलम १०.१९ (अ) (ब) (क) व २० अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाच्या तपासामध्ये आता पर्यंत ७ आरोपींविरुध्द दोषारोपपत्र मा. न्यायालयात सादर करण्यात आले आहे. त्याचा सी.सी.क्र. २६८७/२२ असा आहे. दरम्यान डॉ. अजय अनिरुध्द तावरे यांचे अध्यक्षतेखालील ससून सर्वोपचार रुग्णालय यांचेकडील रिजनल ऑथोरायझेशन कमिटीच्या कामकाजा दरम्यान त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन बनावट व्यक्ती व बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी स्वॅप प्रत्यारोपन करण्यासाठी परवानगी दिल्याने समितीचे तत्कालीन अध्यक्ष व ससुन हॉस्पीटलचे वैदयकिय अधिक्षक डॉ. अजय अनिरुध्द तावरे याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाला आहे.

आरोपीत डॉ. अजय अनिरुध्द तावरे हा सध्या पोर्शे कार अपघात गुन्हयामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यास मा. न्यायालयाच्या प्रॉडक्शन वॉरंटने ताब्यात घेवून नमुद गुन्हयात दिनांक २८/०५/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याच्या रिमांडकामी मा. न्यायालयात दिनांक २९/०५/२०२५ रोजी हजर केले असता आरोपीची दिनांक ०२/०६/२०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर श्री. गणेश इंगळे, हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट