पोलीस अधीक्षक गोंदिया स्तरावरील महिला दक्षता समितीची बैठक संपन्न..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

गोंदिया

    दि. २६/०५/२०२५ रोजी समितीचे अध्यक्ष मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांचे अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे बैठक घेण्यात आली आहे.....सदर बैठकीचे मा. पालकमंत्री साहेब, गोंदिया जिल्हा याचे मान्यतेने पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समितीचे दिनांक १० मे २०२५ रोजी गठण करण्यात आले होते. सदर सदस्य सारणीमध्ये श्रीमती नंदिनी चानपुरकर प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) हे सदस्य सचिव असुन गोंदिया जिल्हयातील अॅड. दुर्गा डोये, अॅड. अनिता दास, डॉ. गागी बाहेकर, सामाजीक कार्यकर्ता श्रीमती संगीता घोष, श्रीमती पुजा तिवारी, श्रीमती शर्मीला पाल, तसेच प्राचार्य अनिता हिरडे, एस.एस.ए. गर्ल्स स्कुल गोंदिया, प्राचार्य रिजवाना अहमद, गुजराती राष्ट्रीय माध्यमिक शाळा गोंदिया, प्राचार्य योगिता भुवनकुमार बिसेन, शारदा कॉन्व्हेन्ट हायस्कुल गोंदिया व श्रीमती रजनी कुंभरे, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, श्रीमती लक्ष्मी तरोणे, जिल्हा परिषद सदस्य गोंदिया आणि श्रीमती सुनंदा उके, पंचायत समीती सदस्य आमगांव यांना समाविष्ठ करण्यात आले होते. 

    सदर समीतीची प्रत्येक दोन महिण्यातुन एकदा बैठक घेण्यात येत असुन त्यामध्ये महिला व विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण तसेच त्यांची सुरक्षा, ईत्यादी बाबत चर्चा करुन उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत... समिती मधील सदस्यांचा ०२ वर्षाचा कार्यकाळ शासनाचे परिपत्रकानुसार पुर्ण झालेला आहे.

   सदर बैठकीमध्ये सदस्यांनी आपआपले अनुभव व्यक्त करुन त्यांनी सुचविलेल्या महिला व विद्यार्थ्यांचे तसेच ईतर जनसामान्य लोकांच्या समस्यांचे निराकरण झाल्याने समाधान व्यक्त करुन गोंदिया पोलीस दलाचे कौतुक करुन आभार व्यक्त केले आहे... तसेच श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी समितीचे सदस्यांनी विविध समस्या बैठकीमध्ये मांडल्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे सोडविणे सुलभ झाल्याचे मत व्यक्त केले आहे.

सदर बैठकीमध्ये डॉ. गार्गी बाहेकार (प्रसुती व स्त्री रोगतज्ञ) गोंदिया, सामाजीक कार्यकर्ता श्रीमती संगीता घोष व पुजा तिवारी, प्राचार्य रिजवाना अहमद गुजराती राष्ट्रीय माध्यमीक शाळा गोंदिया, प्राचार्य योगिता बिसेन शारदा कान्वेट स्कुल गोंदिया, श्रीमती रजनी कुंभरे जि.प. सदस्य गोंदिया, श्रीमती सुनंदा उके पंचायत समिती सदस्य आमगांव, समीतीचे सदस्य सचिव श्रीमती नंदिनी चानपुरकर प्रभारी पोलीस उपअधिक्षक, गोंदिया आणि सपोनी मनिषा निकम, भरोसा सेल गोंदिया, पो.उप.निरी पुजा सुरूडकर दामीनी पथक गोंदिया व मपोहवा तनुजा मेश्राम आणि सुशिला बघेले भरोसा सेल गोंदिया हे सदर बैठकीमध्ये हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट