अल्युमिनियम कंडक्टर ताराचे बंडल व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे ईतर साहित्य असा एकुण किंमती 4,75,000/- रुपयांचा मुद्येमाल गोंदिया गुन्हे शाखेने केला जप्त..

0
Spread the love

सह संपादक रणजित मस्के

गोंदिया

🔹.. याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, तक्रारदार श्री. सुमितसिंग प्रितपालसिंग बग्गा वय 37 वर्ष रा. गणेशनगर गोंदिया व्यवसाय-ठेकेदारी असुन यांनी पोलीस ठाणे रावणवाडी हद्दीतील मौजा- गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार दरम्यान 6 इलेक्ट्रिक खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार किंमती 1,40,000/- रुपयांचे दिनांक 19/4/2025 चे 17.00 वा. ते दि. 20/4/2025 चे 11.00 वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे रावणवाडी येथे दिनांक- 26/04/2025 रोजी अपराध क्र. 186/2025 कलम 303(2 ) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपासात आहे..

  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास तसेच जिल्ह्यातील अज्ञात गुन्हेगार चोरट्यांचा शोध करीत असताना पथकास गोपनीय माहितगाराकडून माहिती मिळाली की,  रावणवाडी येथील वर नमूद गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल ॲल्युमिनियम कंडक्टर ताराचे बंडल हे कालीमाटी येथील कबाडी व्यवसायी ईसम नामे- प्रमोद मेहर याचे कबाडी दुकानात आहेत.....अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे.. ईसम आरोपी नामे- 1) प्रमोद परसराम मेहर वय 34 वर्ष, रा. कालीमाटी, तालुका- आमगाव* यास ताब्यात घेऊन त्याचे दुकानात असलेल्या ॲल्युमिनियम कंडक्टर ताराचे बंडल बाबत सखोल विचारपूस चौकशी केली असता त्यानी  ॲल्युमिनियम कंडक्टर तार चोरी करणारे आरोपी ईसम नामे - 

2) रामा दासीराम मेश्राम, वय 23 वर्ष

3) राजू भागू मेश्राम वय 31 वर्ष, रा.

4) अंकुश जगु मेश्राम वय 25 वर्ष, रा.

5) महेंद्र लखन कांबळे वय 19 वर्ष, रा. तिन्ही बोदा, तालुका- आमगाव, जिल्हा -गोंदिया *

    यांनी अल्युमिनियम कंडक्टर तार व इलेक्ट्रिक चे ईतर साहित्य चोरून आणून त्यास विक्री केल्याचे सांगून..  15,000/-रुपयात  खरेदी केल्याचे सांगितले. वरून नमूद आरोपी क्र 2 ते 5 इसमांना गुन्ह्याचे अनुषंगाने दिनांक 28/ 05/2025 रोजी ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात आले..... विचारपूस चौकशी केली असता नमूद आरोपींनी चोरी केल्याचे कबूल केले.

    आरोपीतांपासून  गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल ॲल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल अंदाजे किंमती  4,50,000/- रुपये व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे अर्थिंग वायर, कब्जे, चॅनेल एक्सटेन्शन वायर अंदाजे किंमती 25,000/- रुपये असा एकुण किंमती 4 लाख 75,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे...आरोपींना पोलीस ठाणे रावणवाडी पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया, आरोपीना अटक, तपास प्रक्रिया रावणवाडी पोलीस करीत आहेत..

🔹 सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री. गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक, सहा पोलीस निरीक्षक- धीरज राजूरकर पोलीस अंमलदार- विठ्ठल ठाकरे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजीत बिसेन, सुबोध बीसेन, हंसराज भंडारकर, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे यांनी कामगिरी बजावली असून कारवाई दरम्यान पोलीस ठाणे रावणवाडी पोलीसांनी विशेष सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट