महाड शहरातील असंख्य मुस्लिम महिलांचा शिंदे गटात आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश….

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड : महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता होत असल्या कारणाने शहराच्या विकासाला योग्य ती चालना मिळाली असल्याचे दिसून येत आहे.यामुळे महाड शहरात देखील दिवसेंदिवस बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असून यामध्ये मुस्लिम समाजही आता मागे राहिला नसल्याचे दिसून येत आहे.

आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर 2022 रोजी महाड शहरातील पानसरे मोहल्ला परिसरातील अनेक मुस्लिम महिलांनी कांगोरीगड महाड येथील कार्यालयात आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी गोगावले यांच्या समवेत त्यांची सुकन्या कोमल गोगावले या जातीने उपस्थित होत्या.
यामध्ये मुस्लिम समाजातील राजकीय वलय असलेले शेख हुसेन काझी यांच्या सुनेचा त्याचप्रमाणे वजीर कोंडीवकर यांच्या बहिणीचा प्रामुख्याने समावेश होता.

शाहीन चिपळूणकर,हसीना शेख ,फिरोजा वेशिवकर, सफिया काझी यांच्यासह असंख्य महिलांचा यावेळी प्रवेश करण्यात आला आहे.

महाड महिला आघाडी संघटक विद्या देसाई यांनी आपल्या सर्व महिला सहकारी वर्गाच्या प्रयत्नाने ही कमाल घडवून आणली आहे. यामध्ये त्यांना आमदार सुकन्या कोमल गोगावले यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. त्यांच्याच हस्ते यावेळी नवीन महिला पदाधिकारी नियुक्त्या देखील करण्यात आल्या.

या प्रवेशप्रसंगी बाबासाहेबांची शीवसेना या पक्षातर्फे शहर प्रमुख श्री नितीन पावले ,शहर संपर्क प्रमुख
श्री सिद्धेश पाटेकर ,शहर संघटक श्री. निखिल शिंदे,युवासेना अधिकारी श्री. सिद्धेश मोरे,माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर,सुनील आगरवाल, डॉ चेतन सुर्वे, नितीन आर्ते,इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट