गांजा (अंमली पदार्थ) ची स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीकडून कार्यवाही

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

अमरावती

मा.श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यां नी अमली पदार्थ विक्री करणारे अवैधधंदे करणा-यांवर जास्तीत जास्त केसेस करुण अवैधचंदयांना आळा बसावा करीता अधिनस्त अधिकारी यांना मार्गदर्शन करुण आदेशीत केले होते.

त्या अनुषंगाने दि. २७/०५/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे पो.स्टे. सरमरापुरा हददीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना विश्वनिय गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सत्तार शाह हुसेन शाह रा. तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार हा त्याचे राहते घरी अवैधरित्या गांजा (अंमली पदार्थ) ची विक्री करीत आहे.

अशा खबरेवरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने N.D.P.S कायदयाचे कार्यवाही नियमावली प्रमाणे राजपत्रित अधिकारी, दोन शासकिय पंच यांचे समक्ष गोपनिय खबरेप्रमाणे सत्तार शहा हुसेन शहा वय ५६ वर्ष रा. तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार यांचे घरी जावुन झडती घेतली असता त्याचे घरातून १ किलो ३०० ग्रॅम कि.अं. २६०००/- रुपयाचा गांजा (अंमली पदार्थ) मिळून आला.

आरोपीकडून एकुण १ किलो ३०० ग्रॅम कि.अं. २६०००/- रुपयाचा गांजा (अंमली पदार्थ) मिळून आल्याने सदरचा गांजा माल रित्तसर जप्त करुण आरोपीला ताब्यात घेण्यात येवुन त्यांचे विरुध्द अनुक्रमे अपराध क्र. १३५/२०२५ कलम ८ (क), २० (ब)ii (ब), N.D.P.S कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला पुढील तपासकामी पोलिस स्टेशन सरमसपुरा यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. विशाल आनंद सो. पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा, मा.श्री. पंकज कुमावत सो अप्पर पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., यांचे आदेशाने पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रविंद्र व-हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक प्रज्वल राउत यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट